आढावा – MASI दिवाळी 2022 कार्यक्रम |
२९ ऑक्टोबर २०२२ रोजी मराठी अससोसिएशन सिडनी इंकॉर्पोरेटेड (मासी) ने दिवाळी निम्मित आयोजित केलेला कार्यक्रम दुर्गा हॉल रीजन्स पार्क येथे सुमारे २५० ते २६० प्रेक्षकांच्या उपस्थित पार पडला . हा कार्यक्रम अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न.
कार्यक्रमाची सुरुवात शिवगर्जना सिडनी यांच्या ढोल ताशाच्या गजरात झाली. ढोल ताशा वाजू लागला आणि मराठी पायांनी ताल नाही धरला तरच नवल. अपेक्षेप्रमाणे, उत्साही मंडळींनी आपली नाचायची हौस भागवून घेतली.
सर्वजण सभागृहात स्थानापन्न झाल्यावर, मासी च्या यंदाच्या कार्यकारी समितीने सर्वांचे स्वागत करून कार्यक्रम सूत्रधाराच्या हाती सुपूर्त केला.
माजी कार्यकारी समिती सभासदांचे त्यांनी केलेल्या कामाबद्दल आभार मानायचे हा विचार यंदाच्या मासी कार्यकारी समितीच्या मनात बरेच दिवस घोळत होता. अनेक वेळा रद्द होऊन, पुढे ढकलून शेवटी ते प्रत्यक्षात आले. सर्व उपस्थित माजी मासी कार्यकारी सभासदांचे मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले. काही अनुपस्थित सभासदांना त्यांच्या आप्त स्वकीयां मार्फत मानचिन्ह पोहोचवण्यातही आले.
या नंतर एक छोटासा परंतु बहारदार नृत्याचा कार्यक्रम झाला. रसिक प्रेक्षकांनी कलाकारांचे मनापासून कौतुक केले.
अल्पश्या चहापानाच्या मध्यन्तरानंतर भावगीते आणि नाट्यगीतांचा के गोड कार्यक्रम पार पडला. गीतांबरोबर तबला आणि पेटीच्या बोलांवर काही लोकप्रिय गाण्याचे सादरीकरण सुद्धा झाले.
दर्दी प्रेक्षकांनी या संगीतमय कार्यक्रमाला भरभरून साथ दिली.
श्रीखंड पुरीचा बेत असेल आणि मराठी मन सुखावले नाही असे कसे होईल. शिस्तबद्ध पद्दतीने, कोणताही गर्दी गोंधळ न करता, सर्वानी जेवणाचा आनंद घेतला.
प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आणि शेवट आखून दिलेल्या वेळेत पार पडणे. कार्यक्रमाच्या सादरीकरणामध्ये नवीन पिढीचा सहभाग, शैलीदार सूत्रसंचालन यासारख्या काही वैशिष्ट्यांचा इथे विशेष उल्लेख करावासा वाटतो
असे असले तरी सगळेच अपेक्षेप्रमाणे पार पडले, काही त्रुटी राहिल्याच नाहीत असे नाही म्हणता येणार. जे राहून गेले त्याचा सुद्धा उल्लेख होणे गरजेचे आहे. उदा. माजी कार्यकारी समिती सभासदांच्या तपशिलात राहिलेल्या त्रुटी. हा तपशील गोळा करणे हे काम वाटले होते त्यापेक्षा अधिक कठीण होते. कार्यक्रम जरी होऊन गेला असला तरी निर्दोष आणि पूर्ण यादी पुढील संदर्भासाठी उपलब्द करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. या बाबत कोणी मदत करू शकणार असेल तर कृपया मासीला संपर्क साधा. एखादी त्रुटी जेवणाबाबत सुद्धा राहिली असेल. जेवणाचे कंत्राट देवस्थानाला द्यावे लागेल ही सभागृह व्यस्थपनाची अट होती. त्यामुळे काही गोष्टी मासी कार्यकारी समितीच्या अखत्यारीत नव्हत्या.
कार्यक्रम पार पाडण्यात अनेक जणांनी हातभार लावले त्या सर्वांचे आभार. काही छोट्या गोष्टी वगळता सर्वानी कार्यक्रमाचा आनंद घेतला असेल अशी आशा आहे आणि आपला सहभाग आणि सहकार्य असेच मिळत राहो ही विनंती
कळावे लोभ असावा,
आपली नम्र
मासी कार्यकारी समिती २०२२. |
Some outstanding achievements from within our Community |
Heartiest Congratulation: Please join us to congratulate them. |
Other Updates |
|
PMP Mentor (Advertisement) |
|
PMP Exam Mentor
PMP Exam Mentor: Free app for project management aspirants
App Download:Apple
Android
Windows
Amazon |
MASI’s Annual Proud Sponsors |
- Hari Om Foods Pty Ltd: Vineet : 0434161831, Vinaya : 0452515030
- Kalyani Transport Pty Ltd: We are excited to announce the launch of our new service. Now you can “Compare and Book”: Flights, Hotels, Tours, eVISA, Trains, Car Rental. Please visit: www.kalyani.com.au or Contact Kalyani Kulkarni: 0430 009 286
|
Get your 2022 MASI membership Online Payment |
Stay up-to date with MASI Join:
Whats App Group | Website | MASI App | Email | Facebook |