Char Choughi – Audiences Accolades

-25th June 2022

एक अविस्मरणीय नाट्यानुभव 

सिडनीमध्ये गेल्या शनिवारी UNSW Auditorium या रंगमंचावर मराठी असोसिएशन सिडनी इनकॉर्पोरटेड म्हणजेच ‘मासी’तर्फे प्रशांत दळवी लिखित “चारचौघी”या नाटकाचा एक अत्यंत वाखाणण्याजोगा प्रयोग सादर करण्यात आला.  त्याविषयी थोडेसे. 

कोविड १९ च्या व्यत्ययामुळे सुमारे दीड वर्षे लांबलेला या नाटकाचा प्रयोग सर्व कलाकारांच्या उत्कट अभिनयानं आणि चारशे पेक्षा अधिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं रंगत गेला. याचं संपूर्ण श्रेय सिडनीतले नाणावलेले दिग्दर्शक संजय लेले यांना,  निष्णात कलाकारांना, व्यावसायिक वाटावा असा देखणा रंगमंच उभा करणाऱ्या तंत्रज्ञांना, कौतुकापलिकडे पोचलेल्या प्रकाश (आणि अचूक अंधार) योजनेला, मराठी नाटक आईकडून समजून घेऊन पार्श्वसंगीत देणाऱ्या तरुण संगीतकाराला, रंग आणि वेशभूषा यात तरबेज असणाऱ्या मैत्रिणींना,  “बोलविते धनी”  या रंगमंच सहाय्यकांना..

 ..अर्थात या सगळ्यांना 

यातल्या प्रत्येकानं प्रेक्षकांच्या उंचावलेल्या अपेक्षांना अधिकच उंचीवर नेऊन योग्य न्याय दिला. 

ही अतिशयोक्ती नाही. Lego च्या छोट्या छोट्या तुकडयांना जोडून त्याचा एक सुंदर, नीटनेटका आकृतिबंध तयार व्हावा असा हा प्रयोग झाला. अत्यंत एकसंघ अशा या नाट्यप्रयोगाशी सिडनीचे अतिशय सुजाण प्रेक्षक एकरूप झाले नसतील तरच नवल! नाटकाचं कथानक प्रामुख्यानं चार स्त्रिया –  आई, विद्या, वैजू, विनी  या तिच्या ३ मुली, आणि त्यांचे चार, नव्हे, ५ जोडीदार यांच्या  

आयुष्याशी निगडित आहे. आईनं अत्यंत अपारंपरिक निर्णय घेऊन मुलींना जन्म दिलाय, 

वाढवलंय, तिन्ही मुलींना याची वेळोवेळी झळ पोचतीय, अगदी त्यांच्या जोडीदारांकडून 

सुद्धा.  नाटकातले चार प्रत्यक्ष नायक आशिष- विद्याचा नवरा, श्रीकांत – वैजूचा नवरा 

प्रकाश आणि वीरेन हे विनीचे २ मित्र – तिला एकाच वेळी २ पुरुषांशी लग्न करायचंय,

आणि आबा या तीन मुलींचे जन्मदाते, पण या तीन मुलींची आई त्यांची अधिकृत पत्नी नाही!

आबा रंगमंचावर फक्त उल्लेखात आणि संवादात आहेत. असं हे चाकोरीबाहेरचं कुटुंब आणि 

त्यांचं जगरहाटी सोडणारं आयुष्य या सर्व कलाकारांनी त्यांच्या सकस, संयत पण परिपूर्ण अभिनयानं 

आणि विलक्षण ताकदीनं प्रेक्षकांपर्यंत पोचवलं, आणि एक परिपूर्ण नाट्यानुभव रसिकांना मिळाला. 

सिडनी मराठी मंडळाला हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

वैजयन्ती मोने


चार चौघी 

प्रशांत दळवी लिखित, संजय लेले दिग्दर्शित आणि अव्वल दर्जाच्या हौशी उभरत्या कलाकारांनी साकारलेले चार चौघी हे तीन अंकी नाटक पाहण्याचा योग काल आला. U.N.S.W. विद्यापीठाच्या प्रासादवत रंगमंचावर खणखणीत आणि अस्खलित मराठी नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला हि कौतुकाची बाब आहे. मासी चे त्यासाठी खास कौतुक. 

विवाहित अविवाहित परित्यक्ता आणि विधवा महिलांचे अधिकार यांबाबत आजही समाजात उदासीनता आहेच. त्यावर चर्चासत्रे आणि वाद विवाद अधून मधून झडत असताना, या चौकटींमध्ये न बसणाऱ्या चौघींचे एका वेगळ्याच प्रतलातले विचार ज्या नजाकतीने आणि धाडसीपणाने दळवींनी शब्दबद्ध केलेत, त्याला सलामच ठोकला पाहिजे. भिन्न वयाच्या स्त्रियांचे आधुनिक विचार, प्रस्थापित मूल्यव्यवस्थेला ठणकावणार्या आणि दैव-नशिबाला दोष न देणाऱ्या, अस्मितेसाठी लढणाऱ्या चौघींचे चित्र हे आजच्या काळात दुर्मिळ नसले तरी नव्वदीच्या दृष्टीने क्रांतिकारीच म्हणावे लागेल. या नाटकात मांडलेले विचार तेव्हा तर स्फोटकच  असतील. आज त्यांची उग्रता तितकी  नसली तरीही त्यातल्या काही विचारांना आजही समाजमान्यता नाही. स्त्रीदाक्षिण्य आणि सक्षमीकरणाच्या गप्पा आपण आजकाल करतो, परंतु, त्याकाळात अविवाहित वयस्कर आई आणि तिच्या विवाहबाह्य जन्मलेल्या मुली, त्यातल्या थोरल्या मुलीचा झालेला /होऊ घातलेला घटस्फोट, मधल्या मुलीचा अस्थिर नवरा आणि पर्यायाने अस्थिर संसार व इतके सगळे कमी म्हणून कि काय धाकट्या मुलीचे स्वतंत्र बाण्याचे २०२२ मध्ये देखील तोंडात बोटे घालायला लावणारे विचार यांची कल्पना व मांडणी दळवींनी ज्या पद्धतीने केली आहे ती खरेच वाखाणण्याजोगीच म्हणावी लागेल.  

माझ वाचन ठीक-ठाक असलं तरी दळवींच्या या पुस्तकाचा आणि माझा सम्बन्ध गेल्या २८ वर्षात कधी आलेला नव्हता. बहुदा माझ्या वाचनातून हे पुस्तक निसटले असावे. त्यामुळे डोकं रिकामं घेऊन, ” बरं बघू” म्हणून यायचा माझा विचार होता. परंतु आमच्या मातोश्रींना माझ्या या योजनेची कुणकुण लागताच त्यांनी पुण्यातून अध्यादेश काढून कान उघाडणी केल्यामुळे किमानपक्षी पुस्तकाला मम म्हणण्यापुरता स्पर्श करून चार पाने चाळून आलो. (फोन व इंटरनेट चे हे दुष्परिणाम, १०-१० हजार किमी वरून live ओरडा खायला मिळतो.) 

पण, हे मला मान्य करावेच लागेल कि चारचौघी नुसते वाचण्यापेक्षा मला नाटक बघण्यात जास्त आनंद आला. वाचताना कधी कधी आपल्या मनातले व्यक्तिचित्रण एकांगी होते. ते आपण आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना जोडून, थोडेसे तिखट मीठ लावून आणि प्रसंगी फोडणी घालून उभे करतो. पण नाटकातले कलाकारांनी त्या सर्व कल्पनेतल्या पात्रांना जिवंत मूर्त स्वरूपात उभे केले. लेले काकांनी जे कलाकार रंगमंचावर उतरवले होते ते पत्त्याच्या  डावातले हुकुमी एक्केच म्हणावे लागतील. 

आईच्या भूमिकेला श्रीमती ललिता कानेटकर यांनी साकारताना आईचा खंबीर स्वभाव आणि प्रसंगी येणारी हतबलता अत्यंत सचोटीने मांडली. त्यापाठोपाठ दुसरे प्रमुख पात्र म्हणजे थोरली कन्या विद्या. विद्येचे पात्र मुळातच आत्मविश्वासू, कणखर आणि खमकं असे. त्या पात्राला न्याय श्रीमती धनश्री करंदीकरांनी खऱ्या अर्थाने दिला. जेव्हा त्या नवर्यासोबतच्या भांडणाच्या एका प्रसंगात “let  me  enjoy this  moment  for  a minute” म्हणून फोन हातात धरून ज्या ताठर बाण्याने नुसत्याच उभ्या राहिल्या त्या प्रसंगाला मी हात जोडून नमस्कार करायचा फक्त बाकी ठेवला होता.

साईप्रसाद कुलकर्णींनी निष्ठेने नाठाळ श्रीकांत वतनदार ची भूमिका साकारली त्यासाठी त्यांना खरोखरच अक्खी सिडनी वतन म्हणून वर सोबत डझनभर कंगवे इनाम म्हणून देऊ केले पाहिजेत. गंभीर पात्रापेक्षा उथळ पात्राची भूमिका साकारणे आणि त्यातले सातत्य प्रारंभापासून पडदा पडेपर्यंत टिकवून ठेवणे हि खरी तारेवरची कसरत. आणि ती कुलकर्णींनी उत्तमरीत्या पेलली असे मी नम्रपणे नमूद करतो. माझ्या अंदाजानुसार, सभागृहातल्या प्रत्येक पुरुषाने श्रीकांत कडून काही notes  घेतलेल्या असाव्यात.

सोबतच मानसी गोरे, मृगजा करंदीकर, सचिन भावे आणि सौरभ दातार यांनी आपापल्या भूमिकांना अत्यंत कौशल्याने सादर केले. वैजू चा अवखळपणा आणि प्रकाश-वीरेन यांच्या स्वभावातला दृश्य फरक, तिघांनी शिताफीने आपल्या चालण्या-बोलण्यातला लकबींमधून दर्शवला. (तिसऱ्या अंकात वाढदिवसाच्या प्रसंगात प्रकाश, वैजू आणि वीरेन ने काचेच्या पेल्यातून एक तपकिरी रंगाचे पेय प्राशन केले, ते नेमके काय होते या बाबत प्रेक्षकांत बरेच कुतूहल व कुजबुज होती. बर्याच लोकांनी बाहेर चहाच्या स्टॉलकडे चौकश्या पण केल्या म्हणे. म्हणलं तुमच्या कानावर घालून ठेवावं.) 

नाटकात अनेक खास क्षण आणि आचंबित करणारी वळणे आहेत जी शेवट्पर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवतात, प्रसंगी थेट तुमच्या हृदयाला हात घालतात. हा अनुभव शब्दबद्ध करणे कठीण आहे.

सदर नाटकाचे दिग्दर्शन नि:संदिग्धपणे उत्तम होते. नाटकाच्या टीमने (क्षमस्व, शब्दमर्यादेमुळे सर्वांचा नामोल्लेख करणे कठीण आहे) काळजीपूर्वक रचलेल्या सेटची रचना, नेपथ्य आणि रंगभूमीवरील सामान (प्रॉप्स) अतिशय बारकाईने जुळवले होते. ध्वनी व प्रकाश व्यवस्था उत्तम आणि साजेशी होती. कलाकारांबरोबरच पार्श्वभूमीवरील टीम ने नाटकाला खऱ्या अर्थाने चार चांद लावले आणि हा सोहळा संस्मरणीय केला. 

मासी तर्फे केलेले कार्यक्रमाचे आयोजन दर्जेदार होते. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून कार्यक्रमाची नीट मांडणीं केलेली होती. त्यासाठी टीम ने उपसलेले कष्ट हे या नाटकाच्या यशस्वी प्रयोगाने सुफळ-संपूर्ण झाले. मध्यंतरात तरतरी आणणारा चहा-कॉफी-बिस्किटांची व्यवस्था, सोबत संध्याकाळच्या आहाराची सोया कोणत्याही व्यावसायिक नाटकांना लाजवेल अशी होती. त्यासाठी आयोजक, प्रायोजक आणि समस्त स्वयंसेवकांचे (आणि त्यांच्या सोबत मला काम करण्याची संधी दिल्याबद्दल) मनापासून आभार. 

अमेय एकबोटे 

Wollongong 

२६. ०६. २०२२


Marathi Association Sydney Inc – MASI

सिडनीत काही मोजकीच उत्तम नाटके होतांत, त्यापैकी हे एक होते. विषय, संहीता विचारमंथन करायला लावणारी, सर्व कलाकारांचा अभिनय हा प्रेक्षकाच्या योग्य वेळी योग्य दाद देण्याने उत्तमच होता हे सिद्ध झाले, सर्व बाजू व्यवस्थित पणे साभाळल्या गेल्या होत्या, तेव्हा दिग्दर्शकांसह सर्व टीम चारचौघी चे हार्दीक अभिनंदन 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍😊व मासी ने एक उत्कृष्ट कार्यक्रम दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार🙏🏻😊


अप्रतीम प्रयोग . 💐💕💕उत्कृष्ट  दिग्दर्शन  , सहजसुंदर अभिनय…

By Tanuja Kundap


Another quality program delivered by MASI. Superb organization, perfect venue. You could see the efforts put in by the committee and their volunteers.

अविस्मरणीय प्रयोग. उत्तम संहिता आणी दिग्दर्शन, सहजसुंदर अभिनय, जोडीला संगीत, नेपत्थय, रंगभुषा आणी वेषभुषा  यामुळे प्रयोगाने एक वेगळी उंची गाठली. सर्वांचे मनापासून अभिनंदन

Chinmay Abhyankar


*”चारचौघी”* *नाटकाच्या* *निमित्ताने* ……म्हणतात ना की हौशिला मोल नाही, अहो हौस म्हणून संजय लेले काकांनी चक्क तीन अंकी नाटकच बसवलं हो आणि तेही सिडनीत ….आणि  हो, त्यांना दुजोरा द्यायला आहेतच आपले  नाटक वेडे सिडनिकर, हौशी कलाकार, त्यात भर “जिथे कमी तिथे आम्ही अस म्हणत त्यांना मदत करणारी अनेक मंडळी जी काल दिवसभर UNSW थिएटर मध्ये आनंदाने राबत होती.

 अहो केवढी ही प्रचंड मेहनत! केवढी ही उठाठेव !! खरंच कमाल.

कितीही अडचणी आल्या तरी नाटक करायचच असं काकांनी जणू ठरवलंच होतं आणि आज त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं. 

मी अगदी १५ दिवसांपूर्वी पहिल्यांदा त्यांना नाटकाच्या practice दरम्यान भेटले, पहिल्या भेटीत च त्यांनी आपलंसं करून घेतलं,मी वेळोवेळी त्याचं निरीक्षण करत होते, केवढं कमालीचं व्यक्तीमत्व आहे, त्याच्या नियोजनच कौतुक करावं तेवढं थोडच आहे, आज दिवसभर असं वाटतं होतं की घड्याळ पूर्णतः त्यांच्या ताब्यात आहे, सगळच वेळेआधी तयार होतं, कुठेही गडबड नाही गोंधळ नाही, मोठ्याने रागावणं नाही सगळं कसं सुरळीत पार पडलं. काका खूप खूप धन्यवाद खूप शिकायला मिळालं तुमच्या कडून.

बाकी सगळ्या कलाकारांच कौतुक करावे तेवढे थोडेच त्यांच्या कलेला, मेहनतीला माझा सलाम.ललिता ताइंचे मनपूर्वक आभार , या वयातही त्यांचा उत्साह, पाठांतर  कौतुकास्पद  ….

धनश्री तुझ्या अभिनयाचे मनापासून कौतुक काही शब्दाचं नाहीत. साईने नाटकात  वेगळीच रंगत आणली, मृगजा, मानसी, सचिन, सौरभ यांचा अभिनय नाटकाचे मुख्य स्तंभ होते

सगळ्या टीम चे मनपूर्वक  अभिनंदन आणि खूप खूप कौतुक.👏👏👏👏

Sanjyot Dongre


Excellent presentation 👏  treat for the audience. Congratulations team!

B Kalaahree


अतिशय नेटका प्रयोग 👏👏

सिडनीतील मराठी रंगभूमीच्या प्रवासातला मैलाचा दगड म्हणता येईल असा कार्यक्रम 🙏🙏

संहितेच्या निवडीपासून नेपथ्यापर्यंत सर्वच गोष्टींवर घेतलेले कष्ट आणि चोखंदळपणा याद्वारे एक दर्जेदार कलाकृती सादर केल्याबद्दल सर्व कलाकार,  सहकलाकार आणि दिग्दर्शक यांना मनापासून धन्यवाद 

👌👌👏👏💐💐

Umesh Thatte


अप्रतिम प्रयोग 👌👏👏👏 सगळयांचे मनःपूर्वक अभिनंदन ..

By Aparna dalal


चारचौघी – अविस्मर्नीय  नाट्यानुभव 

सिडनीतील हौशी कलाकारांनी (दिलसे) सादर केलेले तीन अंकी मराठी नाटक. सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या परिश्रमांना, चिकाटीला, सातत्य आणि निष्ठेला सलाम ! अनेक अडचणींना समोर जाऊन मेहनतीने उभी केलेली देखणी कलाकृती. 

नेपथ्य – बोलकं , नीट नेटकं , कथेला साजेसं 

संगीत – लाईट्स – योग्य आणि प्रभावी 

सर्व कलाकरांचा मुद्राभिनय , देहबोली , संवादफेक , पात्रांमधली वीण , मंचाचा वापर सगळंच अप्रतिम 

रंगभूषा आणि  वेषभूषा – पात्रांचे प्रतिनिधित्व करणारे ,सहज आणि ओघवते बदल 

संजय लेले काका , ललिता ताई आणि धनश्री मानाचा मुजरा 

कालच्या दिवशी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अगदी मनापासून झटणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे खूप खुप कौतुक आणि आभार 

सर्वांचे धन्यवाद 🙏

Preeti Patki


Good morning Tai, natak khup chaan zale. Sarwancha abhinay atishay sunder ….khup enjoy kele. Heartiest congratulations 👏👏👏💐💐💐💐

Roopali Kapote


Well done team “चारचौघी” and team  MASI 👏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻

Heartiest Congratulations 💐

Hemchandra Suryavanshi


अप्रतिम!!! सुंदर झाले कालचे *चारचौघी*  नाटक . सर्व कलाकारांनी खूपच छान काम केले आहे. अजून एक show नक्की व्हायला पाहिजे . @⁨Lalita Kanetkar⁩ ललिता मावशी, धनश्री, मानसी आणि साईप्रसाद यांनी सुरेख काम केले आहे . मृगजा, सौरभ आणि सचिन यांचा पहिलाच show आहे असे अजिबात वाटले नाही . दिग्ददर्शन आणि नेपत्थ… वाहा! क्या बात है… नाटक सुरु झाल्यावर सेट पाहूनच आनंद झाला… सर्व कलाकारांचे आणि team चे कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा . अशीच छान छान नाटक आम्हाला सिडनीमधे घेऊन या…❤️

Kiran Tasgaonkar


Good morning Tai, natak khup chaan zale. Sarwancha abhinay atishay sunder ….khup enjoy kele. Heartiest congratulations 👏👏👏💐💐💐💐

Excellent presentation. Thanks to MaSI for putting up  efforts and making the show available to us. Excellent teamwork

From Kalashree Wakhare


सिडनीत काही मोजकीच उत्तम नाटके होतांत, त्यापैकी हे एक होते. विषय, संहीता विचारमंथन करायला लावणारी, सर्व कलाकारांचा अभिनय हा प्रेक्षकाच्या योग्य वेळी योग्य दाद देण्याने उत्तमच होता हे सिद्ध झाले, सर्व बाजू व्यवस्थित पणे साभाळल्या गेल्या होत्या, तेव्हा दिग्दर्शकांसह सर्व टीम चारचौघी चे हार्दीक अभिनंदन 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍😊व मासी ने एक उत्कृष्ट कार्यक्रम दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार🙏🏻😊

कालच्या अतिशय सुंदर, योजनाबद्ध आणि वेळेचं महत्त्व जाणून केलेलं कार्यक्रमाचं आयोजन हे फारच स्तुत्य आणि अभिमानास्पद! 

MASI मेंबर्स कामात दंग होते, उगाच मिरवत नव्हते. 

‘चारचौघी’  भुकेल्या नाट्यरसिकांना उत्तम मेजवानी!

Napoleon Almeda 


Sanjay and team,

Bravos! Brilliant performance led by the champion Sanjay Lele! 

मी २५ वर्षांपूर्वी हे नाटक बघितलं होतं. नामवंत संच, कुशल दिग्दर्शक, सगळं असूनही नाटकानं मनाची पकड घेतली असं नव्हतं वाटलं. 

पण कालचा प्रयोग बघून थक्क व्हायला झालं!! उत्कट अभिनय, प्रत्ययकारी दिग्दर्शन, देखणं नेपथ्य,

सागर आगाशे brand light and sound effects, चपखल पार्श्वसंगीत सगळं जागच्या जागी असलेला, भारावून टाकणारा नाट्यप्रयोग!!!

तुम्हां सर्वांच्या अथक प्रयत्नांना साजेसे यश मिळालं!! खूप आनंदाची आणि अभिमानान सांगता झाली.

From Dilip Kanitkar


काल आपण सादर केलेल्या

“चार चौघी” या नाटकाच्या यशस्वी प्रयोगानिमित्ताने सर्व कलाकार आणि बॅकस्टेज या बरोबरच इतर टीममेंबर्स चे हार्दिक अभिनंदन…..

एक दर्जेदार कलाकृती म्हणून नक्कीच लक्षात राहील

Upcoming Events