आरोग्य संपदा – भाग 4

Health
स्वयंपाकघर औषधी: ताक ताकाची महती ही काही नवीन नाही. अपचन असो, भूक कमी लागो, पोट डब्ब होवो, घरातले ज्येष्ठ नेहमी सांगायचे, आले हिंग लावून ताक पी म्हणजे त्रास कमी होईल.  ताक हे पचनावर उत्तम कार्य करताना दिसते. पण हे अतिशय उपयुक्त ताक सुद्धा ऋतू, प्रकृती, वय ह्याचा विचार न करता पीत बसले तर त्रास होताना दिसतो. कुठलाही पदार्थ असला अगदी अमृत असले तरी सुद्धा तरीही मनुष्यप्राण्याच्या पोटाच्या काही मर्यादा आहेतच. ताकाबद्दल तर खूपच समज गैरसमज आहेत. महत्त्वाचा मुद्दा हा की दही आणि ताक हे समान नाही. मी ताकाऐवजी दही खातो हा युक्तिवाद होऊ शकत नाही. त्यांच्या करण्यात फरक आहे, दिसण्यात फरक आहे आणि गुणांमध्ये सुद्धा फरक आहे. त्यामुळे एक वाटी दही आणि एक वाटी ताक हे वेगवेगळे परिणाम दाखवतात. ताकाची आधी उपयुक्तता बघुयात.ताक हे पचायला हलके, पचनाला चांगले, पचनशक्ती वाढायला…
Read More

Kids Corner

Activities and Events, Community Noticeboard
Age 5 to Age 12 Kids get creative and send us your drawings/ sketches/painting: Theme: New world in my eyesOrientation of paper: Landscape/PortraitFile format: jpg /svg/pngMax file size: less than 512mb One entry per participant Email: Attach the digital copy considering above details masisydney@gmail.com Include the following details in the email: Name of the ParticipantAge: MASI will create a gallery of these creations and publish them on our website and share it via MASI Facebook.
Read More

दातांचे आरोग्य

Health
पूर्वीची विको वज्रदंती ची जाहिरात आठवतीये?एक आजोबा त्यांच्या दाताने ऊस खातात, आक्रोड तोडतात. आज कोणाला ऊस तोडायला सांगितला तर कदाचित त्यांची दातांची कॅप निघून येईल. हल्ली दातासाठी replacement आणि early short term इफेक्टचे उपाय खूप निघाले आहेत. पुढील वाक्ये घराघरात सर्रास ऐकू येतात: "दात सळसळ करत आहेत? sensitve टूथपेस्ट लावा.""तोंडाला वास येतोय? माऊथ वॉश आहे ना.""दातात खूप plaque जमते? सारखे खसाखसा ब्रश करा.""दात खराब झाला बदलून टाकू.""सारखा दुखतोय काढून टाकतो." आणि अशा सगळ्या त्रासांवर उत्तर आहेच. प्रत्येक गोष्टीला replacement उपलब्ध. (Cosmetic, asthetic आणि अत्यंत आवश्यकता असताना त्याची गरज सोडून.) पण असे वाटते ह्या जाहिरातीत दाखवलेल्या 'सोप्या' उपायांनी लोकांनी मुद्दाम दाताच्या साठी वेगळी काळजी घेणे बंद केले आहे. आयुर्वेदात दाताची प्रकृति नीट राहावी म्हणून दिनचर्येत अतिशय सुंदर उपक्रम आले आहेत. ते पुढे सांगते. पूर्वीपेक्षा दाताचे प्रॉब्लेम्स का बरे वाढले आहेत एवढे…
Read More

डॉक्टर जगन्नाथ दीक्षित – आवाहन

Community Appeal, Community Noticeboard
आवाहनडॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे नाव आपल्या सर्वांना परिचित आहेच. गेली ३१ वर्ष अध्यापक पेशात काम करत असतानाच, डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या कार्याने प्रेरित होऊन डॉक्टर दीक्षित यांनी स्थूलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व अभियानाला सुरवात केली. या वर्षी अभियानाच्या अनुयायांनी पद्मश्री पुरस्कारासाठी डॉक्टर दीक्षित यांचे नाम निर्देशन करायचे आवाहन आपल्याला केले आहे. श्रोतेहो, डॉक्टर दीक्षित यांचे काम पद्मश्री पुरस्कारासाठी आपल्याला योग्य आहे असे वाटत असेल तर त्यांच्या अनुयायांनी केलेल्या आवाहनाला आपण प्रतिसाद देऊ शकता. नाम निर्देशनाची मुदत १० सप्टेंबर पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा limaye.g@gmail.com ह्या ई-मेल वर. Disclaimer: MASI does not endorse this organisation neither has any affiliation with this organisation. This information is added 'as is' and MASI does not make any warranties about the reliabilities, completeness and accuracy of this appeal. Any actions taken based on the…
Read More

ग्रंथ तुमच्या दारी – ऑस्ट्रेलिया

Activities and Events, Marathi Sahitya
'ग्रंथ तुमच्या दारी' ही 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान', नाशिक यांच्याद्वारे सुरु केलेली वाचकप्रिय योजना 'संकल्प- एक निश्चय, मेलबर्न ' मागील ५ वर्षांपासून मेलबर्नमध्ये यशस्वीपणे राबवत असून आजमितीला ७०० पेक्षा जास्त दर्जेदार मराठी साहित्याची पुस्तके मेलबर्नच्या विविध भागात फिरत्या ग्रंथ पेट्यांच्या स्वरूपात वाचनासाठी उपलब्ध केलेली आहेत आणि वाचक त्याचा लाभ घेत आहेत. ''मराठी वाचक जेथे , ग्रंथ तुमच्या दारी तेथे!' … ह्या संकल्पनेवर 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान' काम करते. सदर कार्याच्या ऑस्ट्रेलियातील प्रचार, प्रसारासाठी ' संकल्प- एक निश्चय' ऑक्टोबर २०१६ पासून कार्यरत आहे.मागील वर्षांपासून ही योजना ऑस्ट्रेलियातील इतर राज्यातही वाढ घेऊ लागली आहे. सिडनी मध्ये 'ग्रंथ तुमच्या दारी' चे समन्वयक म्हणून सौ. संध्या पाटील आणि श्री. सर्जेराव पाटील कार्यरत आहेत.या  व्यतिरिक्त ऍडलेड, पर्थ आणि ब्रिस्बेन या शहरातदेखील ग्रंथपेट्या दाखल झाल्या आहेत. 'ग्रंथ तुमच्या दारी' संकल्पनेचे ऑस्ट्रेलियातील स्वरूप थोडक्यात असे आहे  …दर्जेदार विविध विषयांची , लेखकांची…
Read More

Indian Independence Day 15th Aug 2021

Community Noticeboard, Culture, Marathi Culture
भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येवर , स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडवणारी, एक अजरामर दृक्श्राव्य नाट्यकलाकृती अनादि मी, अनंत मी !! दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर भारतीय प्रमाणवेळेनुसार,  शनिवार १४ ऑगस्ट, दुपारी १:३० वाजता  पुनःप्रक्षेपण:  रात्री १०:३० वाजता आणि भारताबाहेरील प्रेक्षकवर्गासाठी रविवार १५ ऑगस्ट : पहाटे १:३० वाजता त्याबरोबरीने, युट्युब चॅनेल @ Doordarshan Sahyadri येथे  आणि फेसबुक पेजवर (@ ddSahyadri) थेट प्रक्षेपण दूरदर्शन निर्मिती:  निरंजन पाठक लेखक/दिग्दर्शक:  माधव खाडिलकर संगीत :  आशा खाडिलकर पुनर्निर्माण:  ओंकार खाडिलकर विशेष सहयोग:  उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट!
Read More

Community Appeal

Community Appeal, Community Noticeboard
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, उत्तर रत्नागिरी जिल्हा* ==================== चिपळूण पुरस्थितीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मदत कार्य चालू केले आहे. मदत कार्याची व्याप्ती खूप मोठी असणार आहे. याकरिता निधीची आवश्यकता आहे. आपण शक्य ती *आर्थिक मदत* करावी ही विनम्र प्रार्थना. संस्थेच्या बँक खात्याचा तपशील खालील प्रमाणे आहे. बँकेचे नाव : जनता सहकारी बँक म. पुणे शाखा : चिपळूण खात्याचा प्रकार:  बचत खाते खात्याचे नाव:R S S Jankalyan Samiti Dist North Rtg खाते क्रमांक : 035220100013114 आयएफएससी: JSBP0000035 बँक खात्यामध्ये रक्कम *डायरेक्ट ट्रान्सफर* केल्यास खालील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून माहिती द्यावी. श्री मंदार लेले  कार्यवाह  चिपळूण जिल्हा रत्नागिरी  9503053770 02355257222 श्री सुरेश घडशी कोषाध्यक्ष चिपळूण जिल्हा रत्नागिरी 9970588689 देणगीची पावती तयार करण्याकरिता 1) पूर्ण नाव  2) पूर्ण पत्ता  3) दूरध्वनी क्रमांक 4) पँन  5) ई-मेल  6) पेमेंट डिटेल्स  इत्यादी कळवावे. रा स्व संघ…
Read More

आरोग्य संपदा, भाग 2

Health
स्वयंपाकघर औषधी  मूग मूग मटकी इत्यादी कडधान्ये शिंबी धान्य ह्या वर्गात येतात. साधारण तुरट गोड चव, पण पचल्यावर तिखट रसाप्रमाणे म्हणजे हलकी, पाचक, कफ नाशक अशा पद्धतीत काम करतात. वातुळ आणि वायू अडवणारी म्हणजेच जास्त खाल्ली तर पोटफुगी, पोट डब्ब करणारी, मलावरोधक अशा पद्धतीत काम करणारी असल्याने न शिजवता सारखी खाऊ नयेत असा संकेत आहे. सर्व द्विदल धान्यामधे मूग सर्वात श्रेष्ठ असून किंचितच वातुळ आहेत.  गुणधर्म:  ✓जुलाब होणे ह्यात कढण स्वरूपात ✓शरीरात खूप कफ, सर्दी, ओला खोकला ह्यात कढण/सूप ✓स्थूल असता मूग वरण, मूग उसळ, मूग पीठ धिरडे ✓वमन विरेचन झाल्यावर वैद्यकीय सल्ल्याने ✓व्रण, घशाच्या आणि डोळ्याच्या विकारात पथ्य म्हणून ✓वसंत ऋतूमध्ये विशेषतः कफाचा त्रास असणाऱ्या लोकांना हितकर ✓पायावरील सूज, बैठे काम, वजनवाढ अशा पद्धतीच्या शरीर विकारात देतात. •विशेष टिप्पणी: द्विदल धान्ये कायम भिजवून शिजवून खावीत. मोड आणून कायम खाल्ली…
Read More

FirstCPR Training

Community Noticeboard
FirstCPR Training:Westmead Applied Research Centre (WARC), The University of Sydney are conducting free FirstCPR education and training for members of the community. Kindly send your expression of Interest to masisydney@gmail.com should you wish to participate in this training.
Read More

थंडीमध्ये जपा प्रकृती

Health
थंडीमध्ये जपा प्रकृती(आहार मार्गदर्शन) सिडनी कर तसे गेले काही आठवडे थंडीचा अनुभव घेत आहेत पण एक जून पासून थंडीचा प्रत्यक्ष ऋतू सुरू झाला. पहाटे पहाटे दुलई पांघरून झोपावे अशी थंडी असते.उठल्या उठल्या कडकडून भूक लागलेली असते, पण उठवत तर नाही.कसं बसं उठून फक्कडसा आल्याचा चहा प्यायला की जर कामे सुचू लागतात नाही का!!मूळात थंडीमध्ये प्रकृती तशी उत्तम असते.आजारी कमी पडतो, ताजेतवाने वाटते, प्रवासाला जायचे बेत ठरतात.अग्नी हा उत्तम असतो.त्यामुळे खाल्ले ते पचले अशी अवस्था असते.म्हणूनच भरपूर गोड आणि स्नेह पदार्थ(तूप, तेल) घालून केलेला फराळ खाण्याचा सण दिवाळी हा सुद्धा थंडीतच येतो. आता सर्वांचा लाडका विषय :’खाणे’ ह्याकडे वळूया.जर तुमची प्रकृती चांगली असेल तर खादाडी करायला थंडी हा उत्तम ऋतू आहे.अपथ्यकर खाणे पण चांगल्या रीतीने ह्याच ऋतूत पचू शकते. रात्रीच्या वेळी मस्त गरम गरम  barbeque केलेल्या भाज्या, मांस इत्यादी खावे.non veg…
Read More