The Chase Australia: सौरव रिसबूड टीम अजिंक्य

चॅनल 7 वरील “The Chase Australia” quiz show: सौरव रिसबूड टीम अजिंक्य – हार्दिक अभिनंदन!

हा कार्यक्रम पाहिला त्या अनेकांच्या मते हा कार्यक्रम एखाद्या T२० सामन्याप्रमाणे चित्तथरारक झाला व अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत Chaser जिंकेल का सौरवची तिघांची टीम जिंकेल ते कळत नव्हते आणि रक्कम ही लहान सहान नव्हती, ३२,००० डॉलर्स चा प्रश्न होता… 

विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे सौरवच्या टीमच्या कामगिरीमध्ये, सौरवचा सिंहाचा वाटा होता व ह्या गोष्टीचा खुद्द Chaser ने विशेष उल्लेख केला ही आपल्या सगळ्यांकरता अभिमानास्पद गोष्ट आहे. 

सोमवारी ७ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता चॅनल 7 वर प्रसारित The Chase Australia’ कार्यक्रम ज्यांना पाहता आला नसेल त्यांच्याकरता ही खालील लिंक देत आहोत.

https://7plus.com.au/the-chase-australia

(Please create your own user code and password so that you can log in)

तर हा कार्यक्रम जरूर पहा आणि या रोमांचकारक क्षणांचा आनंद अनुभवा. हा कार्यक्रम वरील लिंकवर केवळ २८ दिवसच उपलब्ध राहाणार आहे याची जरूर नोंद घ्यावी.

Upcoming Events