AAMS 2022 – संवादिका – ३

AAMS 2022
संवादिका - ३ संवादिका शृंखलेतील तिसर्‍या भागात आपले सहर्ष स्वागत आहे. दुसर्‍या भागात सांगितल्या प्रमाणे अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०२२,  हे दिनांक २३, २४ आणि २५ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित केले आहे. उत्साही स्वयंसेवकांच्या विविध टीम्स  जय्यत तयारी करत आहेत.या महिन्यातील कार्याचा थोडक्यात आढावा खालीलप्रमाणे: स्पॉन्सरशिप टीम – [अभिजीत भिडे, विश्वास चरेगावकर, शैलेश वाळिंबे, मदन देशमुख, नीलेश पाटील, केदार दामले] ·ही टीम २०२१ च्या सप्टेंबर महिन्यापासून कार्यरत झाली आहे त्यामुळे कोविडच्या निमित्ताने आलेल्या आव्हानात्मक परिस्थितीची चांगली कल्पना या सर्वांना होती आणि म्हणूनच  प्रायोजकांचे लक्ष वेधून घेण्याचा नाविन्यपूर्ण पर्याय शोधण्याचा विचार करून अथक प्रयत्न  करत आहेत. · उत्सुक असलेल्या स्थानिक आणि विदेशी प्रायोजकांशी संपर्क व संबंध वाढवून त्यांना या संमेलनातील वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या प्रायोजनाची संधी उपलब्ध करून देणे व बदल्यात त्यांच्या व्यवसायाची उत्तम जाहिरात कशी होईल हे महत्त्वाचे काम ही टीम करत आहे · येत्या काही आठवड्यांमध्येच या टीमचे कार्य पुढच्या टप्प्यावर येऊन त्याची सविस्तर माहिती आम्ही देऊ शकू अशी आशा बाळगतो. · मंडळाचे पदाधिकारी यशवंत जगताप, मनीष मांगले आणि विश्वनाथ आवटे सुद्धा प्रायोजक…
Read More

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन

AAMS 2022
नमस्कार, सर्व प्रथम महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! नवीन वर्ष आनंदी आणि भरभराटीचे जावो.आपल्या सर्वांच्या आवडीचे आणि दर ३ वर्षांनी येणारे अखिल ऑस्ट्रेलिया संमेलन पुढील वर्षी आयोजित करण्यात येत आहे.ह्याच बरोबर कळवण्यास अत्यंत आनंद होतोय कि २०२२ मध्ये होणाऱ्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया करीत आहे.संमेलानाच्या तारखा खालील प्रमाणे निश्चित झाल्या आहेत. दिनांक :- २३ ते २५ सप्टेंबर २०२२ मंडळाची कार्यकारी समिती, कार्यकर्ते, संमेलन समिती, प्रायोजकत्व समिती, विविध उप समिती, सर्व स्वयंसेवक आणि उत्साही सदस्यांच्या सामर्थ्यावर आणि विश्वासावर बांधलेले आपलं नातं, आपला पूर्वानुभव आणि उत्साहाच्या बळावर आपलं आदरातिथ्य दाखवण्याची पुन्हा एकदा ही संधी आहे.अजूनही आपण सर्व आव्हानात्मक स्थितीतून जात आहोत , आपण कोविड -१९ Global च्या जागतिक महामारीला जबरदस्त प्रत्युत्तर देत आहोत. अत्यंत सकारात्मक राहणे आवश्यक आहे २०२२ चे आपले संमेलन ऐतिहासिक आणि संस्मरणीय बनवण्याचे आमचा उद्दिष्ट आहे जे साध्य करण्यासाठी, आपल्यापैकी प्रत्येकाकडून आम्हाला समर्थन, मार्गदर्शन…
Read More