Community Notice Board

आरोग्य संपदा – भाग 7

Health
लहान मुले आणि च्यवनप्राश सध्याच्या पार्श्वभूमीवर ठळक पणे ह्याबद्दल लिहावे असा विचार आला. Immunity booster, immunity kit हे शब्द आता आपल्याला नवीन नाहीत. प्रतिकारशक्ती म्हटलं की आयुर्वेद आणि मग आयुर्वेद प्रतिकारशक्ती म्हटले की च्यवनप्राश आणि गुळवेल हे प्रकर्षाने लोकांपर्यंत पोचले आहे पण अर्धवट ज्ञान ह्या स्वरूपात. सध्या तिसरी लाट आणि मुले हा सर्वांचा हॉट फेवरेट विषय असल्याने लोकांकडून च्यवनप्राशची विचारणा सुद्धा खूप होते. परंतु पूर्ण माहिती नसताना च्यवनप्राश घेत राहणे हे चक्रव्यूहात घुसलेल्या अभिमन्यू सारखे आहे. च्यवनप्राश हे एक रसायन म्हणजे शरीरातील दोष योग्य पातळीवर असताना आणि रोग नसताना शरीर उत्तम करण्यासाठी घ्यायचे औषध आहे. सध्याच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर रोग असताना आणि गेल्यावर बरेच लोक OTC हे औषध घेऊन खातात. इथे लक्षात हे घ्यायला हवे की च्यवनप्राश ही एक अवलेह कल्पना आहे, थोडी जड स्वभावाची. त्यामुळे आजारातून नुकतेच उठल्यावर भूक ताळ्यावर…
Read More

आरोग्य संपदा – भाग 6

Health
yashaprabhaayurveda #misconceptionsexplained मल्टी - व्हिटॅमिन आणि सप्लिमेंटस्: समज गैरसमज एक रुग्ण बऱ्याच वेगवेगळ्या तक्रारी घेऊन आला होता. कोरोना पार्श्वभूमीवर ह्यांनी ह्या गोळ्या सांगितलेल्या, त्यांनी त्या, प्लस भूक लागत नाही म्हणून माझ्या डॉक्टरांनी पूर्वी अमुक ढमुक गोळ्या दिलेल्या अशा ३-४ मल्टी व्हिटॅमिन ची यादी समोर ठेवली. परीक्षणानंतर व्हिटॅमिन बी१२ हे प्रमाणाबाहेर वाढलेले आणि व्हिटॅमिन डी सुद्धा वरील पातळीच्या जवळपास होते हे कळले. शाकाहारी आणि व्हिटॅमिन B १२ कमतरता हे समीकरण इतके पक्के डोक्यात बसले असते की त्यामुळे त्या पातळीकडे लक्ष ठेवण्याकडे बरेचदा कानाडोळा केला जातो. शेवटी वैद्यकीय सल्ल्याने सर्व च्या सर्व व्हिटॅमिन बंद केल्या. ह्या सगळ्या प्रक्रियेत ते औषध सांगणाऱ्या डॉक्टरचा खरे तर दोष नसतो. लोप पावत चाललेल्या ' फॅमिली डॉक्टर ' संकल्पनेचा हा साईड इफेक्ट आहे..तसेच मीडिया मुळे "व्हिटॅमिन=स्वास्थ्य" हे समीकरण जोपर्यंत आपण डोक्यातून काढत नाही हे होतच राहणार. एका…
Read More

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन

AAMS 2022
नमस्कार, सर्व प्रथम महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! नवीन वर्ष आनंदी आणि भरभराटीचे जावो.आपल्या सर्वांच्या आवडीचे आणि दर ३ वर्षांनी येणारे अखिल ऑस्ट्रेलिया संमेलन पुढील वर्षी आयोजित करण्यात येत आहे.ह्याच बरोबर कळवण्यास अत्यंत आनंद होतोय कि २०२२ मध्ये होणाऱ्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया करीत आहे.संमेलानाच्या तारखा खालील प्रमाणे निश्चित झाल्या आहेत. दिनांक :- २३ ते २५ सप्टेंबर २०२२ मंडळाची कार्यकारी समिती, कार्यकर्ते, संमेलन समिती, प्रायोजकत्व समिती, विविध उप समिती, सर्व स्वयंसेवक आणि उत्साही सदस्यांच्या सामर्थ्यावर आणि विश्वासावर बांधलेले आपलं नातं, आपला पूर्वानुभव आणि उत्साहाच्या बळावर आपलं आदरातिथ्य दाखवण्याची पुन्हा एकदा ही संधी आहे.अजूनही आपण सर्व आव्हानात्मक स्थितीतून जात आहोत , आपण कोविड -१९ Global च्या जागतिक महामारीला जबरदस्त प्रत्युत्तर देत आहोत. अत्यंत सकारात्मक राहणे आवश्यक आहे २०२२ चे आपले संमेलन ऐतिहासिक आणि संस्मरणीय बनवण्याचे आमचा उद्दिष्ट आहे जे साध्य करण्यासाठी, आपल्यापैकी प्रत्येकाकडून आम्हाला समर्थन, मार्गदर्शन…
Read More

आरोग्य संपदा – भाग 5

Health
सर्वसाधारणपणे अग्नी ह्या शब्दाने, अन्नाचे पचन करायची ताकदएका स्वरूपातील शरीर धातू दुसऱ्या स्वरूपात बदलायची ताकदज्या गोष्टी आत ठेवायच्या आहेत त्या योग्य ठिकाणीपोहोचवणेनको असणाऱ्या गोष्टी योग्य वेळी बाहेर टाकणे ह्या सगळ्या गोष्टी अभिप्रेत असतात. ह्यात अजून बरेच कंगोरे आणि बारकावे असतात पण ढोबळ मानाने:खूप भूक लागणे किंवा सतत पोटात आग पडल्यासारखे वाटणे हे उत्तम अग्नीचे लक्षण असेलच असे नाही. तात्पुरते वाढलेले पित्त सुद्धा ही लक्षणे दाखवते.व्यक्तिशः प्रत्येक व्यक्तीची पचवायची ताकद ही वेगळी असते. ती त्याच्या अग्निवर अवलंबून असते. ही ताकद तुम्ही थोडी फार औषधे व योग्य आहार विहार ह्यांच्या मदतीने वाढवू शकता.केव्हाही अग्नीच्या क्षमतेनुसार आहाराची मात्रा ठेवावी हे योग्य. एकाच वयाच्या, एका लिंगाच्या, समान शरीर आकार आणि वजन असणाऱ्या व्यक्तींपैकी एकाला १ पोळी लागु शकते तर एकाला दोन. हा त्यांच्या अग्नी मधला फरक आहे. प्रत्येक बदलाव किंवा transformation होताना अग्नी चा…
Read More

आरोग्य संपदा – भाग 4

Health
स्वयंपाकघर औषधी: ताक ताकाची महती ही काही नवीन नाही. अपचन असो, भूक कमी लागो, पोट डब्ब होवो, घरातले ज्येष्ठ नेहमी सांगायचे, आले हिंग लावून ताक पी म्हणजे त्रास कमी होईल.  ताक हे पचनावर उत्तम कार्य करताना दिसते. पण हे अतिशय उपयुक्त ताक सुद्धा ऋतू, प्रकृती, वय ह्याचा विचार न करता पीत बसले तर त्रास होताना दिसतो. कुठलाही पदार्थ असला अगदी अमृत असले तरी सुद्धा तरीही मनुष्यप्राण्याच्या पोटाच्या काही मर्यादा आहेतच. ताकाबद्दल तर खूपच समज गैरसमज आहेत. महत्त्वाचा मुद्दा हा की दही आणि ताक हे समान नाही. मी ताकाऐवजी दही खातो हा युक्तिवाद होऊ शकत नाही. त्यांच्या करण्यात फरक आहे, दिसण्यात फरक आहे आणि गुणांमध्ये सुद्धा फरक आहे. त्यामुळे एक वाटी दही आणि एक वाटी ताक हे वेगवेगळे परिणाम दाखवतात. ताकाची आधी उपयुक्तता बघुयात.ताक हे पचायला हलके, पचनाला चांगले, पचनशक्ती वाढायला…
Read More

Kids Corner

Activities and Events, Community Noticeboard
Age 5 to Age 12 Kids get creative and send us your drawings/ sketches/painting: Theme: New world in my eyesOrientation of paper: Landscape/PortraitFile format: jpg /svg/pngMax file size: less than 512mb One entry per participant Email: Attach the digital copy considering above details masisydney@gmail.com Include the following details in the email: Name of the ParticipantAge: MASI will create a gallery of these creations and publish them on our website and share it via MASI Facebook.
Read More

दातांचे आरोग्य

Health
पूर्वीची विको वज्रदंती ची जाहिरात आठवतीये?एक आजोबा त्यांच्या दाताने ऊस खातात, आक्रोड तोडतात. आज कोणाला ऊस तोडायला सांगितला तर कदाचित त्यांची दातांची कॅप निघून येईल. हल्ली दातासाठी replacement आणि early short term इफेक्टचे उपाय खूप निघाले आहेत. पुढील वाक्ये घराघरात सर्रास ऐकू येतात: "दात सळसळ करत आहेत? sensitve टूथपेस्ट लावा.""तोंडाला वास येतोय? माऊथ वॉश आहे ना.""दातात खूप plaque जमते? सारखे खसाखसा ब्रश करा.""दात खराब झाला बदलून टाकू.""सारखा दुखतोय काढून टाकतो." आणि अशा सगळ्या त्रासांवर उत्तर आहेच. प्रत्येक गोष्टीला replacement उपलब्ध. (Cosmetic, asthetic आणि अत्यंत आवश्यकता असताना त्याची गरज सोडून.) पण असे वाटते ह्या जाहिरातीत दाखवलेल्या 'सोप्या' उपायांनी लोकांनी मुद्दाम दाताच्या साठी वेगळी काळजी घेणे बंद केले आहे. आयुर्वेदात दाताची प्रकृति नीट राहावी म्हणून दिनचर्येत अतिशय सुंदर उपक्रम आले आहेत. ते पुढे सांगते. पूर्वीपेक्षा दाताचे प्रॉब्लेम्स का बरे वाढले आहेत एवढे…
Read More

डॉक्टर जगन्नाथ दीक्षित – आवाहन

Community Appeal, Community Noticeboard
आवाहनडॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे नाव आपल्या सर्वांना परिचित आहेच. गेली ३१ वर्ष अध्यापक पेशात काम करत असतानाच, डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या कार्याने प्रेरित होऊन डॉक्टर दीक्षित यांनी स्थूलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व अभियानाला सुरवात केली. या वर्षी अभियानाच्या अनुयायांनी पद्मश्री पुरस्कारासाठी डॉक्टर दीक्षित यांचे नाम निर्देशन करायचे आवाहन आपल्याला केले आहे. श्रोतेहो, डॉक्टर दीक्षित यांचे काम पद्मश्री पुरस्कारासाठी आपल्याला योग्य आहे असे वाटत असेल तर त्यांच्या अनुयायांनी केलेल्या आवाहनाला आपण प्रतिसाद देऊ शकता. नाम निर्देशनाची मुदत १० सप्टेंबर पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा limaye.g@gmail.com ह्या ई-मेल वर. Disclaimer: MASI does not endorse this organisation neither has any affiliation with this organisation. This information is added 'as is' and MASI does not make any warranties about the reliabilities, completeness and accuracy of this appeal. Any actions taken based on the…
Read More

ग्रंथ तुमच्या दारी – ऑस्ट्रेलिया

Activities and Events, Marathi Sahitya
'ग्रंथ तुमच्या दारी' ही 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान', नाशिक यांच्याद्वारे सुरु केलेली वाचकप्रिय योजना 'संकल्प- एक निश्चय, मेलबर्न ' मागील ५ वर्षांपासून मेलबर्नमध्ये यशस्वीपणे राबवत असून आजमितीला ७०० पेक्षा जास्त दर्जेदार मराठी साहित्याची पुस्तके मेलबर्नच्या विविध भागात फिरत्या ग्रंथ पेट्यांच्या स्वरूपात वाचनासाठी उपलब्ध केलेली आहेत आणि वाचक त्याचा लाभ घेत आहेत. ''मराठी वाचक जेथे , ग्रंथ तुमच्या दारी तेथे!' … ह्या संकल्पनेवर 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान' काम करते. सदर कार्याच्या ऑस्ट्रेलियातील प्रचार, प्रसारासाठी ' संकल्प- एक निश्चय' ऑक्टोबर २०१६ पासून कार्यरत आहे.मागील वर्षांपासून ही योजना ऑस्ट्रेलियातील इतर राज्यातही वाढ घेऊ लागली आहे. सिडनी मध्ये 'ग्रंथ तुमच्या दारी' चे समन्वयक म्हणून सौ. संध्या पाटील आणि श्री. सर्जेराव पाटील कार्यरत आहेत.या  व्यतिरिक्त ऍडलेड, पर्थ आणि ब्रिस्बेन या शहरातदेखील ग्रंथपेट्या दाखल झाल्या आहेत. 'ग्रंथ तुमच्या दारी' संकल्पनेचे ऑस्ट्रेलियातील स्वरूप थोडक्यात असे आहे  …दर्जेदार विविध विषयांची , लेखकांची…
Read More

Indian Independence Day 15th Aug 2021

Community Noticeboard, Culture, Marathi Culture
भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येवर , स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडवणारी, एक अजरामर दृक्श्राव्य नाट्यकलाकृती अनादि मी, अनंत मी !! दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर भारतीय प्रमाणवेळेनुसार,  शनिवार १४ ऑगस्ट, दुपारी १:३० वाजता  पुनःप्रक्षेपण:  रात्री १०:३० वाजता आणि भारताबाहेरील प्रेक्षकवर्गासाठी रविवार १५ ऑगस्ट : पहाटे १:३० वाजता त्याबरोबरीने, युट्युब चॅनेल @ Doordarshan Sahyadri येथे  आणि फेसबुक पेजवर (@ ddSahyadri) थेट प्रक्षेपण दूरदर्शन निर्मिती:  निरंजन पाठक लेखक/दिग्दर्शक:  माधव खाडिलकर संगीत :  आशा खाडिलकर पुनर्निर्माण:  ओंकार खाडिलकर विशेष सहयोग:  उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट!
Read More

Upcoming Events