AAMS 2022 – संवादिका – ३

संवादिका – ३

संवादिका शृंखलेतील तिसर्‍या भागात आपले सहर्ष स्वागत आहे. दुसर्‍या भागात सांगितल्या प्रमाणे अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०२२,  हे दिनांक २३, २४ आणि २५ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित केले आहे. उत्साही स्वयंसेवकांच्या विविध टीम्स  जय्यत तयारी करत आहेत.

या महिन्यातील कार्याचा थोडक्यात आढावा खालीलप्रमाणे:

स्पॉन्सरशिप टीम – [अभिजीत भिडे, विश्वास चरेगावकर, शैलेश वाळिंबे, मदन देशमुख, नीलेश पाटील, केदार दामले]

·ही टीम २०२१ च्या सप्टेंबर महिन्यापासून कार्यरत झाली आहे त्यामुळे कोविडच्या निमित्ताने आलेल्या आव्हानात्मक परिस्थितीची चांगली कल्पना या सर्वांना होती आणि म्हणूनच  प्रायोजकांचे लक्ष वेधून घेण्याचा नाविन्यपूर्ण पर्याय शोधण्याचा विचार करून अथक प्रयत्न  करत आहेत.

· उत्सुक असलेल्या स्थानिक आणि विदेशी प्रायोजकांशी संपर्क व संबंध वाढवून त्यांना या संमेलनातील वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या प्रायोजनाची संधी उपलब्ध करून देणे व बदल्यात त्यांच्या व्यवसायाची उत्तम जाहिरात कशी होईल हे महत्त्वाचे काम ही टीम करत आहे

· येत्या काही आठवड्यांमध्येच या टीमचे कार्य पुढच्या टप्प्यावर येऊन त्याची सविस्तर माहिती आम्ही देऊ शकू अशी आशा बाळगतो.

· मंडळाचे पदाधिकारी यशवंत जगताप, मनीष मांगले आणि विश्वनाथ आवटे सुद्धा प्रायोजक शोधण्याचे काम करत आहेत

फूड व केटरिंग टीम  – [ प्रमुख- चेतन घैसास, सहकारी- माणिक देशमुख व यशवंत जगताप ]

आम्हाला चार केटरर्सकडून खान पान व्यवस्था पुरवण्यासाठी कोटेशन आलेले आहेत.

१) तीनही दिवसांच्या जेवणाच्या मेन्यूबद्दल चर्चा करण्यात आली आहे.

२) वरील सर्व संस्थांकडून खाद्य पदार्थांची यादी व जेवण व्यवस्था यांची योग्य ती माहिती मिळवून. संमेलन समिती फेब्रुवारीच्या सुमारास त्यातील अंतिम पर्याय निवडीचा निर्णय घेऊ शकतील.  

३) फूड व केटरिंग टीम या संस्थांच्या सतत संपर्कात असून जेवण खर्च, वाढप व्यवस्था व स्वयंसेवक मदतनीस संख्या या सर्व विषयांवर बोलणी सुरू आहेत.

ऑनलाईन वेबसाईट माहिती – [ राज शिर्के, रणजित पिसाळ, विश्वनाथ आवटे, सहकार्य – यशवंत जगताप, मनीष मांगले]

· पुण्याच्या एका  वेबसाईट डेव्हलपमेंट कंपनी कडे या संमेलनासाठी आकर्षक, दिमाखदार व माहितीपूर्ण असे संकेतस्थळ तयार कण्याची जबाबदारी सोपवलेली आहे.

· या नवीन वेबसाईटवर संमेलनाची रंजक माहिती असेलच त्याव्यतिरिक्त आतापर्यंत  झालेल्या संमेलनाची  उपलब्ध असलेले छायाचित्रे, क्षणचित्रेही असतील.

· २०२२ संमेलनाचे कार्यक्रम वेळापत्रक व तिकीट बुकिंगची सोयही असेल, महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांसाठी सवलतीच्या दरांत तिकीट उपलब्ध करून देण्याचा  आम्ही विचार करत आहोंत.

· मार्च २०२२ मध्ये आपल्या सर्वांसाठी संमेलनाची वेब साईट उपलब्ध  करण्याचा समितीचा प्रयत्न आहे. Early सवलतीची तिकीट विक्री याच सुमारास सुरू करण्याचा विचार आहे, आपल्याला विनंती आहे की पुढील संवादिकेकडे सर्वानी लक्ष ठेवावे.

· Zoom वर आयोजित कार्यक्रम – (अजिंक्य पवार, प्रशांत जाधव सहकार्य- सर्व संमेलन समिती सदस्य)

मागील भागात कळवल्याप्रमाणे संमेलनाचाच एक भाग म्हणून zoom वरून २२ जून पासून  काही कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाईल.

· या शृंखले साठी  विविध क्षेत्रातील यशस्वी कलाकारांची ओळख आणि त्यांनी केलेल्या कामाची यादी करणे सुरू आहे.

· त्यातील काही कलाकारांशी बोलणी शेवटच्या टप्प्यात आली आहेत.

संमेलनाची तिकीट विक्री – ( मनीष मांगले, यशवंत जगताप, विश्वनाथ आवटे, शिवानी पोखळेकर सहकार्य- सर्व संमेलन समिती सदस्य)

· रेग्युलर  व early bird सवलतीच्या दरातील तिकीट विक्री व्यवस्थेची आखणी सुरू असून ती  शेवटच्या टप्प्यात आली आहे.

· रसिकांसाठी Early Bird सवलत हा सर्वोत्तम पर्याय आहे, ज्यात Zoom वरील कार्यक्रमांची तिकिटे सुद्धा सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात येतील. ( यातील कार्यक्रमांची यादी लवकरच जाहीर केली जाईल)

· अधिक माहितीसाठी या पुढे येणार्‍या संवादिका व मंडळाच्या वेबसाईट वर नक्की लक्ष ठेवत रहा.

· तिकीट विक्रीचा थेट संबंध स्पॉन्सरशिपशी असल्याने आपण स्पॉन्सरशिप टीमला खूप शुभेच्छा देऊया. स्थानिक, राज्यस्तरीय व विदेशी प्रायोजक मिळवण्याचे महत्त्वाचे काम  हा गट अविश्रांत मेहनत घेऊन करत आहे, त्यांच्या मेहनतीला सलाम.

विविध कला गट – ( प्रणव जतकर, नेहा सोमण)

· संमेलन स्थळी सजावटीसाठी ठेवल्या जाणाऱ्या विविध लक्षवेधी कलाकृती व फलकांची निवड करण्याचे काम सध्या सुरू आहे

· संमेलन स्थळाला  भेट देऊन पाहणी करण्याचे, तसेच तेथील जागेचा कसा उपयोग करून घेत येईल याची आखणी करण्याचे महत्त्वाचे काम लवकरच पूर्ण करण्याचा समितीचा मानस आहे.

· सर्व कलाकार व कलात्मक दृष्टिकोन असलेल्या उत्साही लोकांना प्रोत्साहन देणे हा उद्देश असल्याने सर्वांना विनंती की त्यांनी पुढे येऊन आपली रुची व्यक्त करावी आणि या कार्यक्रमाच्या आनंद सोहळ्यात सहभागी व्हावे.

व्हॉलेंटीअर / स्वयंसेवक टीम – ( प्रशांत जाधव,  सहकार्य – विश्वनाथ आवटे )

· ज्या लोकानी संमेलनाचे स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांचे मनापासून आभार.

· ह्या कार्याला हातभार लावू इच्छिणाऱ्या उत्साही लोकांची भरपूर गरज भासणार असल्याने अजूनही ज्यांना आपली उपलब्धता कळवायची असेल त्यांनी volunteers@aams2022.org.au या ईमेलवर संपर्क साधावा.

· संमेलन समिती साधारण दोन आठवड्यांमध्ये सर्व स्वयंसेवकांची बैठक आयोजित करणार आहे ज्यात संपूर्ण संमेलनाच्या आखणीवर विचारविनिमय केला जाईल.

संमेलन कार्यकारिणी समितीची इतर कार्ये :

· संमेलनात उपस्थितांसाठी एक surprise element असणार आहे, त्याची तयारी माणिक, यशवंत, मनीष व विश्वनाथ करत आहेत.

· संमेलनात सहभागी होण्याची तसेच आपली कला सादर करण्याची संधी व्हिक्टोरियामधील तसेच इतर राज्यातील मराठी लोकांना मिळावी या हेतूने ई-मेल सर्व राज्यांत वितरित केला आहे. (टीप : सहभागासाठी आंतरराज्यीय अर्ज हे त्या त्या राज्याच्या मराठी मंडळां मार्फतच स्वीकारले जातील )

· आम्ही परदेशी कलाकारांसोबत त्यांच्या वेळापत्रक वर काम करत आहोत आणि लागणारी अर्थसंकल्पीय व्यवस्था, सध्याच्या व्हिसा निर्बंधांबाबत स्पष्टतेची वाट पाहत आहोत.आम्हाला अनुकूल परिणामाची अपेक्षा आहे आणि आम्ही तुम्हाला लवकरच कळवू .

· सिडनी, ब्रिसबेन, कॅनबेरा, पर्थ व ऑकलंड(NZ ) येथील महाराष्ट्र मंडळांबरोबर अध्यक्ष यशवंत जगताप यांनी यशस्वी व सकारात्मक चर्चा केल्या आहेत.

स्वयंसेवकांसाठी पाठवलेल्या ईमेलला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. समिती प्रत्येकाचे कलागूण  लक्षात घेऊन त्या त्या विभागात स्वयंसेवकांना सहभागी करेल. ज्यांना मागील दोनसंवादिका मिळाल्या नसतील त्यांनी volunteers@aams2022.org.au या लिंक वर समितीशी त्वरित संपर्क साधावा.

Upcoming Events