अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन

नमस्कार,

सर्व प्रथम महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! नवीन वर्ष आनंदी आणि भरभराटीचे जावो.
आपल्या सर्वांच्या आवडीचे आणि दर ३ वर्षांनी येणारे अखिल ऑस्ट्रेलिया संमेलन पुढील वर्षी आयोजित करण्यात येत आहे.
ह्याच बरोबर कळवण्यास अत्यंत आनंद होतोय कि २०२२ मध्ये होणाऱ्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया करीत आहे.
संमेलानाच्या तारखा खालील प्रमाणे निश्चित झाल्या आहेत.

दिनांक :- २३ ते २५ सप्टेंबर २०२२

मंडळाची कार्यकारी समिती, कार्यकर्ते, संमेलन समिती, प्रायोजकत्व समिती, विविध उप समिती, सर्व स्वयंसेवक आणि उत्साही सदस्यांच्या सामर्थ्यावर आणि विश्वासावर बांधलेले आपलं नातं, आपला पूर्वानुभव आणि उत्साहाच्या बळावर आपलं आदरातिथ्य दाखवण्याची पुन्हा एकदा ही संधी आहे.
अजूनही आपण सर्व आव्हानात्मक स्थितीतून जात आहोत , आपण कोविड -१९ Global च्या जागतिक महामारीला जबरदस्त प्रत्युत्तर देत आहोत. अत्यंत सकारात्मक राहणे आवश्यक आहे २०२२ चे आपले संमेलन ऐतिहासिक आणि संस्मरणीय बनवण्याचे आमचा उद्दिष्ट आहे जे साध्य करण्यासाठी, आपल्यापैकी प्रत्येकाकडून आम्हाला समर्थन, मार्गदर्शन आणि आशीर्वादांची आवश्यकता असेल.
सर्वांनाच हे संमेलन आपलेसे वाटते आणि सर्व मंडळी ह्या संमेलनात सर्वतोपरी सहभागी होण्यास उत्सुक असतात.
तरी आपण सर्वांनीं जास्तीत जास्त प्रमाणात या सम्मेलनात मनःपूर्वक सहभागी होऊन अखिल ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांसमोर आपले विविध कलागुण, कलाकृती, व्यावसायिक गुणविशेष , क्रीडा कौशल्य सादर करावेत ही विनंती !

आम्हाला आशा आहे की लवकरच Covid-19 चे संकट दूर होईल व भारतातून येणाऱ्या पाहुण्यांचे व कलाकारांचे, मान्यवरांचे सुद्धा कार्यक्रम आपण संमेलनात अनुभवू.

आपल्या संमेलनाची संकल्पना ही पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ह्या पंचतत्वांवर आधारित आहे. पंचतत्त्व हे आपल्या जीवनाचे सार आहे. पंचतत्त्वातून पंचतत्त्वाकडे हि संकल्पना आपल्या मराठी संस्कृतीला नवीन नाहीच.
संमेलनाचा आराखडा तयार करण्या पासून तर संमेलनाच्या सांगते पर्यंतचा संपूर्ण प्रवास ह्याच संकल्पनेवर आम्ही आधारलेला आहे.
आपण आपल्या विविध कला गुणांनीं , कलाकृती , व्यापार, शिक्षणतज्ज्ञ गुणांनी , आरोग्य , क्रीडा , समाज कार्य अशा विषयांना बांधून आप आपले गुणकौशल्य साजरे करणार आहोत.

संमेलन २०२२ चं कार्य जोमाने सुरु आहे. कार्याच्या प्रगतीचा आलेख खालील प्रमाणे आहे:

१) ऑक्टोबर २०२१:- संमेलनाचे चिन्ह निवडणे – पूर्ण.

२) नोव्हेंबर २०२१:- संमेलनाची वेबसाईट – प्रगतीपथावर
  काम चालू आहे.

३) डिसेंबर २०२१:- संमेलन तिकीट पूर्व-बुकिंग,
   ऑस्ट्रेलियातील इतर मंडळांची सर्व समिती बरोबर
   बैठक,प्रोमोशन विडिओज.

४) जानेवारी २०२२:- प्रवेशिका/एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट
   प्रारंभ,संमेलन प्रायोजक संपर्क भाग-१.

५) फेब्रुवारी २०२२:- प्रोमोशन विडिओस,संमेलन कलाकृती
   आणि हस्तकला स्पर्धा, प्रवेशिका/एक्स्प्रेशन ऑफ
   इंटरेस्ट समाप्ती.

६) मार्च २०२२:- ऑस्ट्रेलियातील इतर शहरातील मंडळांची
  सहभागाची पुष्टी.

७) एप्रिल ते ऑगस्ट २०२२:- जोरदार सराव,जय्यत
   तय्यारी,कंत्राटदारांशी,परदेशी कलाकारांशी,
   अतिथींशी बोलणी / करार.

८) जून २०२२:- AAMS २०२२ व्याख्यानमाला प्रारंभ.

९) सप्टेंबर २०२२:- २३ सप्टेंबर रोजी संमेलन प्रारंभ व २५
   सप्टेंबर रोजी सांगता.

संमेलन समिती

कार्यकारिणी  समिती:माणिक देशमुख, अजिंक्य पवार, रेश्मा परुळेकर, प्रणव जतकर, प्रशांत जाधव, विश्वनाथ आवटे, मनिष मांगले, निखिल दलाल, प्रीतम घोगळे, राजेंद्र शिर्के, रणजित पिसाळ, अमित आगरकर, शिवानी पोखळेकर, सुजय पाटील, निखिल पातोडेकर, नेहा सोमण, यशवंत जगताप. प्रायोजकत्व समिती:निलेश पाटील, शैलेश वाळिंबे, मदन देशमुख, केदार दामले, विश्वास चरेगावकर,अभिजित भिडे. विशेष डिझाईन समिती:केतकी सबनीस, पृथा कुलकर्णी, अदिती कीर्तने 
माहिती आणि तंत्रद्यान:बिपीन मेहता, निशांक सामंत, निखिल पातोडेकर, अमोलिका रिंगे, सतिश मराठे.
खानपान सल्लागार:
चेतन घैसास.


संमेलन समितीचे काम जोरदार चालू आहे. जसजशी आम्ही प्रगती करू तसतशी आम्हाला अधिक स्वयंसेवकांची आवश्यकता भासेल, संमेलन कार्यकारिणी समिती आपण सर्वांना ह्या संमेलनाच्या कार्यात संमेलन स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी आवाहन करते, संमेलन स्वयंसेवक नोंदणी करण्यासाठी volunteers@aams2022.org.au ह्या ID वर ईमेल करून कृपया संपर्क साधावा हि विनंती.

संमेलनचा पल्ला यशस्वीपणे गाठण्यासाठी सर्व समित्या आपापल्या परीने अथक परिश्रम घेत आहेत.

समित्या आणि सर्व स्वयंसेवक त्यांची भूमिका आणि जबाबदारी समजून व पूर्णतः सांभाळत निस्वार्थपणे सेवा करत आहेत.समितीच्या सदस्यांनी एकमेकांशी सुसंवाद आणि समन्वय साधण्यास सुरवात केली आहे.

आपल्या सर्वांना नियोजन, कार्यपद्धती व स्वीकारलेल्या जबाबदार्‍यांचे पालन करून उच्च दर्जाची पातळी गाठायची आहे हेच ध्येय घेऊन आम्ही सर्व कार्य करत आहोत व विविध समित्यांची बैठका घेऊन संपर्कात आहेत

हे तुमचे आमचे, आपल्या सर्वांचे संमेलन आहे.जग यशस्वीरित्या कोविड-१९ साथीच्या आजारातून बाहेर पडत असताना, AAMS 2022 समित्यांची ह्या उत्साहाला गती देण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे.

कोविड-१९ नंतरच्या पहिल्या संमेलनाचे आयोजन करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, जागतिक पातळीवर प्रवास आणि पर्यटन,आर्थिक व इतर समस्या असतांना सुद्धा, आपण आपले लक्ष्य समोर ठेवून आपण प्रगती केली पाहिजे.

संमेलनाची मोठी जबाबदारी पार पाडण्य़ात आपल्या सर्वांचे संपूर्ण सहकार्य, सदिच्छा व आशिर्वाद आमच्या बरोबर आहेत अशी खात्री आणि आशा बाळगतो.

संमेलनाविषयीची माहिती, प्रगती व तपशील महिन्यातून एकदा आम्ही आपल्याशी संवादिकेच्या माध्यमातून ई-मेल द्वारे देत आपल्या संपर्कात राहूच . ह्या शिवाय ई-मेल संवादिके नंतर काही दिवसांनी सोशल मीडिया चॅनेल्स च्या माध्यमातून (facebook, whatsApp, Youtube ) सुद्धा आपल्या समोर सादर केली जाईल. येतील.

चला तर मग लागू तयारीला आणि भेटूया लवकरच…!

आपला स्नेहांकित,
यशवंत जगताप
अध्यक्ष-महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया आणि संयोजक-अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०२२

Upcoming Events