आरोग्य संपदा – भाग 8
**पाणी हेच जीवन??!!** पाणी हे जीवन, भरपूर पाणी प्या, पाणी पचायला फार कष्ट नसतात म्हणून जास्त पाण्याने फार त्रास होतं नाही अशी वाक्ये सगळ्यांच्या कानावर पडत असतील. 'Hydrated' राहणे हे एक चकचकीत 'Fitness' ब्रीद वाक्य झाले आहे. आता तर applications निघाली आहेत पाणी पिण्याची आठवण करण्यासाठी. कामात बुडून जाऊन पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होऊ नये ह्यासाठी काळजी घेतली पाहिजे. तहान लागणे हा एक नैसर्गिक वेग आहे तो अडवायचा पण नाही, आणि तहान नसताना उगाच पाणी ही प्यायचे नाही. सकाळी पाणी प्यायची फॅशन पण तशी जुनीच. त्या बाबतीत सगळ्यात जास्त घोळ हा किती पाणी प्यावे ह्या प्रकारावर घातला जातो. सगळ्यात सोपे हेच आहे की तहान लागली की पाणी प्यावे. काही साध्या सोप्या पाण्याच्या रेसिपीज बघुया: १. उकळून आटवलेले पाणी: पाणी उकळून १/२, १/४, किंवा १/८ केले की ते अधिकाधिक हलके होत जाते.…