आरोग्य संपदा, भाग 2

स्वयंपाकघर औषधी 

मूग

मूग मटकी इत्यादी कडधान्ये शिंबी धान्य ह्या वर्गात येतात. साधारण तुरट गोड चव, पण पचल्यावर तिखट रसाप्रमाणे म्हणजे हलकी, पाचक, कफ नाशक अशा पद्धतीत काम करतात. वातुळ आणि वायू अडवणारी म्हणजेच जास्त खाल्ली तर पोटफुगी, पोट डब्ब करणारी, मलावरोधक अशा पद्धतीत काम करणारी असल्याने न शिजवता सारखी खाऊ नयेत असा संकेत आहे. सर्व द्विदल धान्यामधे मूग सर्वात श्रेष्ठ असून किंचितच वातुळ आहेत. 

गुणधर्म: 

✓जुलाब होणे ह्यात कढण स्वरूपात

✓शरीरात खूप कफ, सर्दी, ओला खोकला ह्यात कढण/सूप

✓स्थूल असता मूग वरण, मूग उसळ, मूग पीठ धिरडे

✓वमन विरेचन झाल्यावर वैद्यकीय सल्ल्याने

✓व्रण, घशाच्या आणि डोळ्याच्या विकारात पथ्य म्हणून

✓वसंत ऋतूमध्ये विशेषतः कफाचा त्रास असणाऱ्या लोकांना हितकर

✓पायावरील सूज, बैठे काम, वजनवाढ अशा पद्धतीच्या शरीर विकारात देतात.

विशेष टिप्पणी: द्विदल धान्ये कायम भिजवून शिजवून खावीत. मोड आणून कायम खाल्ली जाणारी द्विदल धान्ये ही पचनाला अत्यंत त्रासदायक असतात. मूळव्याध, मलावरोध असता तर आवर्जून टाळावे. सर्व द्विदल धान्यात मूग सर्व श्रेष्ठ आहेत. वाटाणा व चवळी अत्यंत वातकर आहेत. 

मुगाचे कढण व्यवहारात वेगवेगळ्या पद्धतीत सांगितले जाते. परंतु ग्रंथांत साधारण अख्खे हिरवे मूग न भिजवता धुवून १४-१८ पट पाण्यात उकळून दाणा शिजला की गाळून प्यावे असा संकेत आहे. त्यात सल्ल्याने मिरे पूड, सुंठ, तूप – जिरे फोडणी घालून, सैंधव घालून अशा विविध पद्धतीत देता येते. 

©️वैद्य स्वराली शेंड्ये

यशप्रभा आयुर्वेद

Disclaimer: This information is for informational purposes only. It is not meant as a  substitute for the advice of a Doctor or other health care professional. You should not use this information for self diagnosis or treating a medical condition 

Upcoming Events