ग्रंथ तुमच्या दारी – ऑस्ट्रेलिया
'ग्रंथ तुमच्या दारी' ही 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान', नाशिक यांच्याद्वारे सुरु केलेली वाचकप्रिय योजना 'संकल्प- एक निश्चय, मेलबर्न ' मागील ५ वर्षांपासून मेलबर्नमध्ये यशस्वीपणे राबवत असून आजमितीला ७०० पेक्षा जास्त दर्जेदार मराठी साहित्याची पुस्तके मेलबर्नच्या विविध भागात फिरत्या ग्रंथ पेट्यांच्या स्वरूपात वाचनासाठी उपलब्ध केलेली आहेत आणि वाचक त्याचा लाभ घेत आहेत. ''मराठी वाचक जेथे , ग्रंथ तुमच्या दारी तेथे!' … ह्या संकल्पनेवर 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान' काम करते. सदर कार्याच्या ऑस्ट्रेलियातील प्रचार, प्रसारासाठी ' संकल्प- एक निश्चय' ऑक्टोबर २०१६ पासून कार्यरत आहे.मागील वर्षांपासून ही योजना ऑस्ट्रेलियातील इतर राज्यातही वाढ घेऊ लागली आहे. सिडनी मध्ये 'ग्रंथ तुमच्या दारी' चे समन्वयक म्हणून सौ. संध्या पाटील आणि श्री. सर्जेराव पाटील कार्यरत आहेत.या व्यतिरिक्त ऍडलेड, पर्थ आणि ब्रिस्बेन या शहरातदेखील ग्रंथपेट्या दाखल झाल्या आहेत. 'ग्रंथ तुमच्या दारी' संकल्पनेचे ऑस्ट्रेलियातील स्वरूप थोडक्यात असे आहे …दर्जेदार विविध विषयांची , लेखकांची…