चियर्स टू लाइफ
अप्रतिम! दर्जेदार!! अतिउतकृष्ट!!!……आसंच वर्णन नुकत्याच, म्हणजे २२ एप्रिल २०२३ रोजी सिडनी ऑस्ट्रेलियामधील यूएनयेसडब्लूच्या सायन्स थिएटर मधे सादर झालेल्या मराठी असोसिएशन सिडनी (मासी) निर्मित ‘चियर्स टू लाइफ’ या नाटकाच्या प्रयोगाचं करावं लागेल….. मूळ सुशांत खोपकर लिखित या नाटकाचा सिडनीतील पहिला नी एकमेव प्रयोग सिडनी येथील लोकल मराठी कलाकारांनी फक्त यशस्वीच केला नाही, तर अक्षरशः सुपरहिट केला. दर्जेदार लेखनाला अत्युच्च दिग्दर्शन आणि कसदार अभिनयाची जोड मिळाल्यामुळे प्रयोग डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. प्रेक्षकांचा हशा, टाळ्या, शिट्ट्या आणि प्रसंगी हुंदके या सगळयांनी त्या प्रेक्षगृहातल्या निर्जीव भिंती नी खुर्च्यादेखील जणू म्हणाल्या…..’चियर्स टू लाइफ’……. मराठी असोसिएशन सिडनी (मासी) आयोजित या प्रयोगाला सुपरडूपरहिट बनवण्याचं श्रेय जाते ते नरेंद्र अंतुरकर आणि योगेश पोफळे या दिग्ददर्शी जोडगोळीला आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या अथक मेहनतीला. घर गृहस्ती नी कामकाज सांभाळत केलेल्या या प्रयत्नाचं खऱ्या अर्थाने या सर्वच कलाकारांनी चीज केलं आसं…