कोविड महामारी नंतर दोन वर्षांनी आपण सर्वजण उत्सव साजरा करण्यासाठी श्री मंदिर ऑबर्न येथे रविवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी एकत्र येणार आहोत. हा उत्सव साजरा करताना कोविड विषयी NSW Govt. आणि श्री मंदिर ऑबर्न त्यांचे नियम आणि मार्गदर्शन तत्वे लक्षात घेऊन सर्वतोपरी काळजी घेतली जाईल. यामुळे कार्यक्रमाच्या स्वरूपात काही बदल करावे लागल्यास सर्वानी सहकार्य करावे ही विनंती.
सकाळी १०.०० वाजता श्री गणेश पूजा सुरु होईल व साधारण ११.३० च्या सुमारास महाआरती सपंन्न होईल. दुपारी १२ नंतर श्री मंदिर स्थानी महाप्रसादाच्या वितरणाची सोय असेल.
आपणास महाप्रसाद तयार करण्यासाठी आर्थिक मदत करावयची असल्यास आपण कृपया श्री भूषण करंदीकर, श्री शिरीष रबडे, श्री दिलीप कानिटकर यांच्या पैकी कोणालाही त्वरित संपर्क साधावा ही विनंती. आपल्या आर्थिक मदतीनेच आपला गणेशोत्सव अधिक जोमाने व उत्साहात साजरा होऊ शकेल.
याबरोबरच महा-प्रसाद व पूजा आयोजनासाठी स्वयंसेवकांची गरज आहे. ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया शिरीष रबडे यांना संपर्क साधावा.
महा-प्रसादसाठी आपण सर्वांना पोळ्या देण्यासाठी विनंती करत आहोत. ज्यांना पोळ्या देण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया श्री शरद कानिटकर यांना – ०४०९९०२०५० किंवा श्री विनायक जाधव यांना ०४१५८७४१२७ या नंबरवर फोन, मेसेज किंवा व्हाट्सअँप द्वारे संपर्क साधू शकता. प्रत्येक कुटुंबानी सर्वसाधारण २५ पोळ्या आणाव्यात ही विनंती.
ह्या गणेशोत्सवात आपण सर्वांनी सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती. तर भेटूया श्री मंदिर स्थानी (286 Cumberland Road, Auburn) रविवारी ४ सप्टेंबर रोजी. |