कालिदास समिती तर्फे निवेदन
दि. १७ जुलै २०२१ रोजी होणा-या कालिदास जयंती कार्यक्रमासाठी साहित्य पाठविण्याची २० जून २०२१ अंतिम तारीख होती. सर्व साहित्यिकांचे प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
या वर्षीच्या कार्यक्रमाच्या सर्व प्रवेशिका पूर्ण झालेल्या आहेत. कार्यक्रमाच्या वेळेचा विचार करता यापुढे आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाऊ शकणांर नाहीत याची कृपया नोंद घ्यावी व त्यासाठी कालिदास समिती दिलगिरी व्यक्त करते.
कालिदास जयंतीची दर्जेदार सादरीकरणासाठीची तालीम तारीख २६ जून दुपारी १ ते ५ या वेळांत होणार आहे. यापूर्वी पाठविलेल्या शेअर्ड वेळापत्रकाची इमेल जर कोणाला मिळाली नसेल तर ज्या इमेलने साहीत्य पाठवले त्याचा जंक फोल्डर चेक करावा व वेळ त्वरीत राखून ठेवावी. काही अडचण आल्यास आशिर्वाद आठवले यांस 0408174755 या नंबरवर संपर्क करावा.
महत्वाचे म्हणजे कोविडसह एकंदर परिस्थितीचा पुनर्विचार करावा लागल्याने ही तालीम समिती झूम द्वारे ॲानलाईन करणार आहे व त्या साठी कोणालांही प्रवास करायची गरज राहिलेली नाही, हे महत्वाचे कृपया लक्षांत घ्या. या संबंधी काही अडचण असल्यास समितीच्या कोणत्याही कार्यकर्त्यास संपर्क करावा.
या कार्यक्रमाची तिकीटे सर्वांनी लवकरात लवकर मासीच्या ॲपवरून अथवा वेबसाइटवरून लिंक लवकरांत लवकर बुक करावीत.
सर्व साहित्यिक मंडळींपैकी जर कोणी मासीची या वर्षीची मेंबरशीप घेतली नसेल तर कृपया लवकरांत लवकर कार्यक्रमापूर्वी जरूर घ्यावी ही विनंती.
तेव्हा लक्षांत असू द्या दि १७ जुलै २०२१ दु ३:३० , दुर्गा मंदीर ॲाडिटोरियम २१ रोज क्रिसेंट रीजेन्ट्स पार्क
धन्यवाद.
कालिदास समिती |