नमस्कार,
मासी जे विविध उपक्रम राबवते त्यामध्ये सुमारे 15 ते 20 वर्षापूर्वी मासीने आकाशवाणी हा उपक्रम अंतर्भूत करून घेतला होता. तेव्हापासून आकाशवाणी प्रसारीत करत असलेले Radio Programs मासीचा एक उपक्रम म्हणून सादर होऊ लागले. त्यामुळे आकाशवाणीला एका नोंदणी झालेल्या अधिकृत संस्थेचा भाग असल्याचा फायदा आणि आर्थिक पाठबळ मिळाले तर मासीला आपल्या उपक्रमांचा प्रसार करण्यासाठी आणखी एक माध्यम मिळाले. दोहोंचा सुंदर समन्वय उभयतांना खूप काही देऊन गेला.
गेल्या दशकात प्रसार माध्यमांच्या स्वरुपात अणि त्यासाठी लागणार्या साधनांमध्ये आमूलाग्र बदल झाला. एकीकडे काही तांत्रिक गोष्टी सोप्या अणि सोईस्कर झाल्या तर त्याचाच परिणाम म्हणजे त्यासाठी असलेल्या बांधिलकीच्या पूर्तता यंत्रणा (compliances) क्लिष्ट झाल्या.
अशा नव्याने उपस्थित झालेल्या तांत्रिक बाबी सांभाळण्यात सुसूत्रता यावी, आकाशवाणीला आपले Radio Programs अणि मासीला आपले उपक्रम अधिक कार्यक्षम पद्धतीने राबवता यावेत म्हणून 3 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मासीच्या सर्वसाधारण सभेत मासीने खालील निर्णय घेतले.
1. एक जुलै पासून आकाशवाणी एक वेगळी संस्था म्हणून काम करेल. ती मासीचा भाग असणार नाही.
2. आकाशवाणीच्या नवीन घटनेप्रमाणे तयार झालेली कार्यकारी समिति अणि मासी 2024 ची कार्यकारी समिति या बदलांची सर्व कार्यवाही 30 जून 2024 पर्यंत पूर्ण करतील.
एक गोष्ट इथे नक्की नमूद करावीशी वाटते की यापुढे मासी अणि आकाशवाणी जरी दोन वेगळ्या संस्था म्हणून काम करणार असल्या तरी त्यांच्या मधील समन्वय अणि सामंजस्य कुठेही कमी होणार नाही याबाबत मासी सतत प्रयत्नशील राहील. आकाशवाणी आपले Radio Programs अणि मासी आपले उपक्रम राबवत राहील अणि एकमेकांमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा न करता समाजाला काहीतरी चांगले देत राहतील ही अपेक्षा.
नवीन स्थापन झालेल्या आकाशवाणी संस्थेला आणि कार्यकारी समितीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
आपली,
मासी कार्यकारी समिती 2024. |