MASI Diwali 🪔 2023 – आहवाल |
१४ ऑक्टोबर २०२३ रोजी मासीच्या संभासदानी एकत्र येऊन दिवाळी निमित्त एक बहारदार मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. टिकीटांचे दर, त्याबदल्यात देऊ केलेल्या गोष्टी, सहभागी कलाकार या सर्वांचा विचार करता कार्यक्रमाला संभासदांचा उत्तम प्रतिसाद मिळणार याची अपेक्षा होती आणि संभासदानी तसाच प्रतिसाद दिला सुद्धा. अवघ्या तीन आठवड्यात सर्व तिकिटे संपली. नाईलाजाने अनेक संभासदांचा तिकीट न मिळाल्यामुळे हिरमोड करावा लागला.सुमारे ४० वर्षा पूर्वी एक दिवा सौ सरोजताई रानडे आणि सौ ललिता ताई कानेटकर यांच्या प्रेरणेतून प्रज्वलित झाला होता जो आजही मसी च्या रूपाने तेवत आहे. त्यांच्याच हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिकरित्या सुरुवात झाली
गाण्यांची निवड, गायन आणि वादानाचा दर्जा, कलाकारांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी होती. सर्व स्थानिक कलाकार आपले पोटा पाण्याचे काम सांभाळून विविध कलांचे अंग जोपासत एखाद्या व्यावसईक कलाकारा इतक्या तोडीचे सादरीकरण करतात ही कौतुकाची बाब आहे आणि असे कलाकार आपल्याला लाभले आहेत ही आपल्यासाठी भाग्याची आणि अभिमानाची बाब आहे. सर्व प्रेक्षकांनी दिलेली उत्सपूर्त दाद हे याच गोष्टीची साक्ष होती.
कार्यक्रमाची आखणी करताना तो शक्य तितका सर्वसामावेशी असावा याचा देखील विचार केला गेला. त्यासाठी वातावरणात थोडा वेगळा रंग आणण्या साठी flash mob dance चा विचार काही उत्साही तरुण मंडळी समोर मांडला आणि त्यांनी तो उचलून तर धरलाच आणि खूप कल्पकतेने सादर केला.अनेक प्रेक्षकांनी त्यांना साथ देत आपली नाचण्याची हौस जमेल तशी भागवून घेतली.
कलाकारांच्या कलेला योग्य मंच आणि दाद देणारे रसिक मिळाल्या शिवाय पूर्णत्व येत नाही. संस्था म्हणून मासी आणि संस्थेच्या आपुलकीपोटी कोणत्याही कामासाठी कायम तत्पर आसलेल्या स्वयंसेवकांनी घेतलेले कष्ट, आयोजक संघाने केलेला बारीक सारिक गोष्टींचा विचार, नियोजन, याचा उल्लेख आणि त्याचे महत्व अधोरिखीत केल्या शिवाय पुढे जाता येणार नाही.
इतक्या कमी तिकीट दरात इतके सर्व मासी कसे करू शकते असा प्रश्न अनेकांच्या मनात आल्या शिवाय राहिला नसेल, न राहवून काहींनी तो मासीच्या कार्यकरणी सदस्याना विचारलाही. या बाबत फार सविस्तर विश्लेषण न करता काही ठळक गोष्टी इथे नमूद करायला हरकत नाही. सर्व प्रथम कोणताही नफा न कमावता काम करण्याच्या तत्वावर मासी ची उभारणा केली आहे यामुळे येणारा खर्च निघेल इतकीच जमा करण्याचा प्रयत्न केला जातो. काही कार्यक्रमाना जेव्हा अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळतो तेव्हा जमा झालेली अधिक रक्कम इतर कार्यक्रमां साठी वापरता येते बरोबरच संभासदांकडून जमा होणारी वर्गणी त्यांना कोणत्या न कोणत्या मार्गाने परत देण्याचा उद्दिष्ट सुद्धा यामुळे साध्य होते. शेवटी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, विवध क्षेत्रात पारंगत सभासद कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता, निरपेक्ष पणे गेली अनेक वर्षे संस्थेसाठी काम करत आहेत त्याचा सर्व सभासदांना खूप मोठा फायदा होतो.
कार्यक्रम बहुतांशी यशस्वी आसला तरी उणिवा नव्हत्याच किंवा काही राहून गेलेच नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. काही अपरिहार्य तांत्रिक बाबी आसतील, नियोजनातल्या त्रुटी आसतील तर काही ऐन वेळी उभ्या ठाकलेल्या अडचणी आसतील. त्यामुळे काही लोकांची थोडी गैरसोय सुद्धा झाली असेल. प्रयत्न करूनही टाळता येण्या सारख्या काही गोष्टी राहणारच. काही प्रसंगी संयोजकांची आणि स्वयंसेवकांची खूप तारांबळ उडली परंतु सारे सुरळीत पार पडावे यासाठी सऱ्यानी आटोकाट प्रयत्न केले. बहुतेक संभासदानी आशा वेळी संयम बाळगत परिस्थिती समजाऊनही घेतली, परंतु एखाद्या छोट्या गैरसोई बाबत स्वयंसेवका बद्दल जर कुणी तक्रारीचा सुर लावला असेल तर त्यांनी त्या स्वयंसेवकाच्या मनस्थितीचा अजून थोडा विचार करावा अशी कळकळीची विनंती करावीशी वाटते. कुठल्याही कौतुकाची आशा न ठेवता, निरपेक्ष पणे ‘आपल्या आनंदा साठी करायचे’ असे म्हणत ते कोणत्याही कामासाठी ते आपल्यासाठी उभे आसतात. असे कार्यक्रम होत रहावेत असे वाटत असेल तर संयोजक आणि स्वयंसेव यांच्या मानस्थितीचा थोडा अधिक उदारतेने विचार करावा असे राहून राहून वाटते |
🎵Bandish and Reflections [Advertisement] |
Listen using Headphones
Happy Rays Productions presents
🎵Bandish and Reflections : Episode 1🎵
🎧Headphones highly recommended 🎧
🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶 On the auspicious occasion of Navratri presenting 🎶”Mahalaxmi Ashtak”🎶
Singer : Harshala Vaidya
A devotional composition set in 3 ragas.
Composed by Shri Shekhar Kumbhojkar.
Recorded and Mastered by Kiran Pradhan @ Muzitek Creations.Video Creation by Apurv Naik
Seek Blessings !!🙏😊
Kindly like , comment and Subscribe our YouTube channel.
Do not forget to tap bell icon to get updates of our
creative work🎶🎶😊🙏 |
Last Minute Productions (Advertisment) |
|
आशिष पाटील हे नाव आता घराघरात पोचले आहे. एक डान्स
choreographer आणि कलेचा साधक. लावणी ही महाराष्ट्राची लोकधारा आहे, आणि ह्या हरवत चाललेल्या कलेला जोपासण्याचे काम Ashish Patil सारखे कलाकार करत आहे. ह्या कलाकाराला
Last Minute Productions तर्फे ऑस्ट्रेलिया मध्ये डान्स workshop घेण्यासाठी बोलावता आले आहे. तुम्हा सर्वांचा पाठिंबा गृहीत धरूनच, ह्या पहिल्यांदाच होणाऱ्या workshop ला register लवकर करा.. काही जागा शिल्लक Book Today |
|
Aarya entertainment (Advertisment) |
On public demand, Sydney मधे पुढच्या Show ची झाली आमची तयारी
सोशल मीडियावर सुरु झाली जोरदार Inquiry
आपल्या सगळ्यांची REUNION -झिम्मा २ – New Show added
Third Show
3rd December 2023 – Hoyts Cinema – Blacktown – https://tugoz.com/arya/jhimma-2
Ticket booking – please select Blacktown which second in line on the link.
गाणं पहा इथे: Book Now
आणि रिल करुया सगळे.Please like our page @aryamarathioz for more updates. |
Preksha Art & Culture (Advertisment) |
|
Save the Date: Prekshaa Art and Culture Inc: Presents
Ke Dil Abhi Bhara Nahi (A play in Hindi) : 28th April 2024 |
|
मराठी दोन अंकी नाटक ‘नथुराम गोडसे'(Advertisment) |
|
E3 Events and Kalyani Transport Presents
शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिकेत मराठी दोन अंकी नाटक ‘नथुराम गोडसे’.
नाटकचे नाव – नथुराम गोडसे
स्थळ – C3 Church Silverwater, 108 Silverwater Road, Silverwater, NSW
2128
तारीख – 13/7/2024
वेळ – सायंकाळ 4.00 वाजता पासून
स्पॉन्सरशिप, स्टॉल्स, आणि इतर माहितीसाठी कृपया संपर्क साधा
कल्याणी कुलकर्णी +61 430 009 286
ईमेल – Kalyani@e3events.com.au
तिकिट्स लवकरच उपलब्ध होईल.
E3 Events च्या Facebook आणि Instagram पेजवर लाईक आणि फॉलो करा . |
|