‘मासी संवादिका’ च्या निमित्ताने ! |
मंडळी नमस्कार,
काही दिवसांपूर्वी मासीने ‘मासी संवादिका’ या मालिकेचा पहिला भाग प्रसारित केला. सर्वप्रथम उत्तम सादरीकरणाबद्दल सर्व सादरकर्त्यांचे मनापासून अभिनंदन!
कला, ज्ञान, व्यवसाय आणि इतर अनेक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेली स्थानिक गुणी मंडळी आणि त्याच बरोबर कलेला योग्य दाद देणारे रसिक, ज्ञान आणि व्यवसाय याची उपयुक्तता/महत्व समजणारे या दोहोंची मुबलकता असा सुंदर योग नेहेमीच सिडनीच्या वाट्याला आलेला आहे. विविध माध्यमांतून गेली अनेक वर्षे आपण हे अनुभवतच आहोत. द्रुकश्राव्य माध्यमाचा वापर करून या दोहोंचा संवाद अधिक प्रभावी करण्याचा ‘मासी संवादिका’ मार्फत मासी प्रयत्न करत आहे. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, त्याचा योग्य वापर करण्याचे ज्ञान असणाऱ्या आणि इतरही सर्व बाजू सांभाळू शकणाऱ्या सक्षम कार्यकर्त्यांची मासीकडे असलेली उपलब्धता ही आणखी एक मोठी जमेची बाजू आहे.
गेल्या काही वर्षात सामाजिक, तांत्रिक क्षेत्रात विलक्षण बदल झाले. त्याचे फायदे तोटे हा एक वेगळा चर्चेचा विषय होईल. त्यामध्ये आत्ता न शिरता, काळानुसार बदलणे क्रमप्राप्त आहे तसेच पारंपरिक गोष्टींचे मूल्य जपत, त्यांची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड कशी घालता येईल यावर पुढील उपक्रमांचे बरेचसे यशापयश अवलंबून राहणार आहे या दोन्ही गोष्टींबाबत कुणाचे फारसे दुमत नसावे. हा मुद्दा मुळाशी धरून ‘मासी संवादिका’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
कला, ज्ञान व व्यवसाय अशा विविध क्षेत्रांशी निगडीत प्रत्येकी पाच मिनिटांच्या तीन भागांचा मिळून एकूण पंधरा मिनिटांचा कार्यक्रम या स्वरूपात महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ‘मासी संवादिका’ प्रसारित होईल. प्रसारणाची वारंवारिता आणि स्वरूप उपक्रमाला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार बदलते राहील.
जाता जाता परंतु सर्वात महत्वाचे, ‘मासी संवादिका’ हा आपला उपक्रम आहे, त्यामुळे आपल्या सर्वांचा सहभाग आणि सहकार्य हा त्याच्या यशामधला मूलभूत घटक असणार आहे. तुम्हाला काही सादर करायची इच्छा असेल किंवा काही प्रश्न अथवा अभिप्राय असतील तर मासीला जरूर masisydney@gmail.com वरती संपर्क साधा. जर आपण ‘मासी संवादिका’ चा पहिला भाग आजून बघितला नसेल तर तो या लिंक MASI Sanvadika 1: YouTube
वर जरूर बाघा, like, share व subscribe करा.धन्यवाद. |
Save the Date: नाटक…नाटक…नाटक |
शनिवार दिनांक 22 April 2023.
मराठी असोसिएशन सिडनी Inc (MASI) निर्मित दोन अंकी नाटक:
‘चिअर्स टू लाईफ’….एका चौकोनी कुटुंबाची चौकटी बाहेरील कहाणी.
लेखक- सुशांत खोपकर
दिग्दर्शक – नरेंद्र अंतुरकर
अधिक माहिती लवकरच प्रकाशित करू …. |
Young Achievers Page |
We have initiated a new page to encourage our next generation and have put together a page to list their achievements. Our Young Achievers: Our Heartiest congratulations! A big thank you to the parents who requested us to initiate this important gesture to encourage our next generation. Please keep the feedback going and we shall keep the page updated! |
MASI Seasons Greetings |
With some relief from COVID, MASI was able to get to its normal functioning and were able to stage and host a plethora of events:
- Marathi Ekankika
- Marathi Udjojika
- Marathi Natak Char Choughi
- Bhondla in association with Gujrathi Mandal
- Volunteering at the Auburn Ganapati Mandir Ganesh Utsav
- A superb show at the Akhil Australia Marathi Sammelan
- Diwali & Krutadyanta Shohola
- Launch of MASI Sanvadika
to mark the end of an amazing year 2022.
We were able to provide stage to 100+ performers & artists from various fields from all age groups. We cannot thank them enough of their time and dedication in helping us stage these events. MASI Team would also like to take this opportunity to thanks all its Members, Supporters, Sponsors (both event and Annual) and volunteers without their support MASI could not have achieved what it has achieved in the year 2022.
MASI Team would like to wish you all a very happy and a safe festive season. Wish you all have a wonderful year ahead.
We look forward to your continuing support as we move into the new Year 2023.
Best Wishes,
MASI Team 2022. |
Thank you to MASI’s Annual Proud Sponsors |
- Hari Om Foods Pty Ltd: Vineet : 0434161831, Vinaya : 0452515030
- Kalyani Transport Pty Ltd: We are excited to announce the launch of our new service. Now you can “Compare and Book”: Flights, Hotels, Tours, eVISA, Trains, Car Rental. Please visit: www.kalyani.com.au or Contact Kalyani Kulkarni: 0430 009 286
|
We look forward to you all joining us again next year. 2023 MASI membership will open soon for year 2023. |
Stay up-to date with MASI Join:
Whats App Group | Website | MASI App | Email | Facebook |