मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड |
Sakhi Ga Sakhi 2023 |
MASI is back again with more colours and lots to offer for every Sakhi. The theme for this event is FRIENDSHIP.साधी पण हवीहवीशी वाटणारी अशी मैत्री..
कधी आईशी, तर कधी सासुशी,
कधी मुलीशी तर सहजच झालेल्या ओळखिशी,
सामान्य स्वरस्ये असणारी तर कधी भिन्न होऊन कडकडून भांडणारी,
अलगद उलगडत गेलेली पण भक्कम पाया असणारी..किती किती त्या व्याख्या, पण भावना अगदीच समान मोलाच्या.. चला तर मग, मैत्रीच्या या सुंदर कार्यक्रमात अनुभव घेऊया धमाल मस्ती आणि आस्वाद भोजनाचा..Date: 24th June 2023
Venue: Granville Town Hall
Time: 9:30am to 3:00pm
Please find our booking link below- Book Online
_Team Sakhi2023_: Kalyani Kulkarni, Neha Godbole, Vaishnavi Joshi, Rani Musale, Manisha Shirodkar, Ruchita Bhave welcomes you to this most loveable day to cherish bonds of friendship and create new ones.. For more information contact: masisydney@gmail.com |
कालिदास जयंती २०२३ |
रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी || चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी|| रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर|| येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर||
काय मग कालिदास जयंतीची नांदी ऐकू आली ना?? कालिदास जयंतीचा साहित्यसोहळा यावर्षी आपण साजरा करतोय…
‘ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ ही आस असणाऱ्या आणि साहित्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या तमाम लेखक-कवी मंडळींनी…आपलं लेखन सादर करण्यासाठी लेख, कथा, कविता, चारोळी लवकरात लवकर पाठवावे हि विनंती!!
शनिवार , दिनांक १५ जुलै २०२३ रोजी, दु. ३:३० वा
कार्यक्रमाचे स्थळ: रेडगम फंक्शन सेन्टर, वेंटवर्थविल.
दरवर्षी प्रमाणेच सर्व साहित्य Quality Assurance (QA) समिती कडे पाठवले जातील.
QA समिती निःपक्षपातीपणाने प्रत्येक साहित्यकृतीची स्वतंत्रपणे मूल्यांकन करतील. आमचा इतकाच आग्रह आहे की –
- लेखन मराठीत असावे.(इथे राहणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीतल्या मुलांनी इंग्रजीत लिहीलं तर चालणार आहे. पण मराठीतला त्यांचा प्रयत्न नक्कीच स्वागतार्ह असेल)
- लिखाण स्वतःचे असावं आणि इतरत्र प्रकाशित झालेले नसावं.
- साहित्य पाठवताना कुठेही तुमच्या नावाचा संदर्भ नसावा जेणेकरुन QA समितीला पाठवताना कोणताही त्रास होणार नाही.
- कार्यक्रमासाठी सादरीकरणाची वेळमर्यादा : कविता/चारोळी – ५ मिनीटे , कथा / लेख – १० मिनीटे
- सर्व साहित्य – kalidasjayanti2023.sydney@gmail.com ह्या ई-मेल Id वर, २० जून २०२३ पर्यंत पाठवावे. ह्या दिवसानंतर पाठविलेले साहित्य QA करता येणार नाहीत आणि पर्यायाने स्वीकारताही येणार नाहीत.
ह्या साहित्य उत्सवात आपला आणि आपल्या मुलांचा सहभाग अपेक्षित आहे, तुम्हां सर्वांच्या उदंड प्रतिसादाची आणि उपस्थितीची मनापासून वाट बघत आहोत.
आपले स्नेहांकित,
कालिदास जयंती समिती
योगेश पोफळे – ०४०६५१११९३ सचिन भावे – ०४२६०८२६४६ वीणा कुलकर्णी – ०४१९३६१८५० |
HSC ATAR Prize 2022 |
Mr Deepak Avasare sponsors cash prize to the highest HSC ATAR students achieving ATAR above 99 from MASI members each year. Please send names and details to masisydney@gmail.com for HSC high achievers for the year 2022. |
आढावा : MASI प्रस्तुत दोन अंकी मराठी नाटक ‘ Cheers to Life’ |
|
MASI Memberships 2023 |
We look forward to you all joining Get your 2023 MASI membership Online Payment to avail
- Hari Om Foods Pty Ltd: Get vouchers worth $10 (Annual Memberships) and $20 (Life Membership) on Hari Om Foods products. Contact: Hari Om Foods Pty Ltd: Vineet : 0434161831, Vinaya : 0452515030
- Discounted tickets for all upcoming MASI events in the current year 2023!
|
Stay up-to date with MASI Join:
Whats App Group | Website | MASI App | Email | Facebook |
|
This is an automated email so please do not reply to this email. If you wish to contact us please use the following link.
MASI newsletters strictly abide to the rules and regulations for e-marketing and use regulated programs to carry out sending and maintaining newsletters. MASI does not disclose any personal details of their members to third parties. Please note this email is generated from the new MASI website (https://masi.org.au)
For more details : Privacy
|