टेम्पल ऑफ ह्यूमॅनिटी (तोही )

नमस्कार!
आज सर्वाना हे सांगताना आम्हाला खूप आनंद होतोय कि आपले सर्वांचे टेम्पल ऑफ ह्यूमॅनिटी ( तोही )  आता खूप धूम धडाक्यात १ वर्ष ४ महिने पूर्ण करत आहे. खूप इव्हेंट आपण पूर्ण केले. टेम्पल डे,  दत्त जयंती , माघी गणपती उत्सव, श्री गजानन महाराज प्रगट दिन आणि ऑस्ट्रेलियातील सर्वात पहिल्या आपल्या देवांच्या  श्री गुरुदेव दत्त , श्री गजानन महाराज आणि  श्री स्वामी समर्थ मूर्ती आणि पादुका आपल्या सिडनी मध्ये टेम्पल ऑफ ह्यूमॅनिटी मध्ये आता विराजमान झाल्या आहेत. सर्वाना आग्रहाचे आमंत्रण, आपल्या टेम्पल ला  या , आपल्या सर्वांशी जुडा.
https://www.facebook.com/groups/www.templeofhumanity.org.au/?ref=share

https://forms.gle/3vK5WTMJ1h5aFAhb7

Please Register your RSVP in Above link. 
आपण सर्वच आपले टेम्पल ऑफ ह्यूमॅनिटी आणि आपले सर्व देव मूर्ती लवकरात लवकर स्वतःच्या रेंटल जागी स्थापित व्हावे म्हणून विविध फंड रेझिंग  इव्हेंट वर्षभर करणार आहोत.
आता आपण श्री स्वामी समर्थ प्रगट दिन साजरा  करत आहोत एप्रिल ३ ला पॅरामेट्टा ला. स्वामी समर्थ जाप , तारक मंत्र, मूर्ती दर्शन आणि आरती महाप्रसाद ह्या सर्वांचा येणाऱ्या भाविकांना लाभ मिळेल.
हे उत्सव साठी कोणतीही फी आकारली जाणार नाहीये. सर्वांसाठी खुले आहे. फक्त तुमची उपस्थिती रजिस्टर करा म्हणजे आपल्याला नीट प्लॅन करता येते इव्हेंट ला.
आम्ही टेम्पल ऑफ ह्यूमॅनिटी ) तोही) सर्वाना हे भावनिक आवाहन करीत आहोत कि ज्यांना हि शक्य असेल त्यांनी कृपया आपल्या टेम्पल साठी भरघोस देणगी द्या. आपल्या देवासाठी आपण सर्वानी मिळून एकत्रितपणे जितके जमेल तितके दान करूयात. कोणतेही कमीत कमी किंवा जास्तीत जास्त रक्कम असे कसलेलंही बंधन नाही , हे स्वप्न भव्य आहे पण हे शक्य आहे  जर आपण सर्व एक होऊन जितके जमेल तितके , जितकी इच्छा असेल तितकी टेम्पल ऑफ ह्यूमॅनिटी ला देणगी स्वरूपात सेवा देऊ.  सोबत फ्लायर आणि त्यावर बँक डिटेल्स हि देत आहोत.
जेव्हा कधी तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही कितीही कधीही डोनेट करू शकता.
प्रत्येक इव्हेंट चा खर्च, वेबसाईट , सोशल मीडिया आणि फंड रेझिंग करून टेम्पल च्या रेंटल जागेसाठी आपण आता फंड जमा करत आहोत. आपल्या प्रत्येकाचे हे स्वतःच्या टेम्पल चे स्वप्न हि इच्छा आता मूर्तिमंत स्वरूपात पूर्ण होत आहे आणि ते लवकरात लवकर व्हावे म्हणून सर्वानी च थोडासा हातभार लावला तर हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल ह्यात शंकाच नाही.
तुम्ही सर्वानी आज पर्यंत आम्हाला साथ दिलीत तशीच ती यापुढेही देत राहाल ह्यात शंकाच नाही. ३ एप्रिल ला नक्की या आपल्या स्वामींच्या प्रगट दिन सोहळ्यासाठी आणि आपण सर्व मिळून पुढे आणखी  वर्षभर काय काय करता येईल ते ठरवू. तुमचे इच्छा, तुमचे सल्ले , मार्गदर्शन आम्हाला नक्कीच मदत करेल.

तुमचीच सर्वांचीच लाडकी

टेम्पल ऑफ ह्यूमॅनिटी (तोही ) टीम

Upcoming Events