Latest Updates

श्री मंदिर ऑबर्न गणेशउत्सव 
सालाबादप्रमाणे श्री मंदिर ऑबर्न येथे श्री गणपती उत्सव करण्याचा उत्सव समितीचा मानस होता पण करोना च्या पार्श्वभूमीवर यंदाचा  सार्वजनिक उत्सव होणार नाही याची नोंद घ्यावी. हा निर्णय श्री मंदिर आणि उत्सव समिती यांनी संयुक्त पणे घेतला आहे.  प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार मंदिरात प्रसाद तयार करणे आणि त्याचे वाटप करण्यास बंदी आहे. आपण यावर्षी महाप्रसाद तयार करत नसल्याने प्रसादासाठी पैसे जमा करणार नाही आणि तसेच पोळ्या ही जमवणार नाही. आपणास श्री मंदिर  साठी काही देणगी अथवा पूजे साठी पैसे द्यावयाचे असल्यास आपण कृपया श्री मंदिर संस्थेला संपर्क साधावा.  आपणा सर्वांच्या वतीने श्री सचिन आणि सौ अपर्णा दामले प्रसाद तयार करून श्री मंदिर यांच्या सोयीनुसार ऑबर्न येथे जाऊन श्री ना प्रसाद अर्पण करतील.  आपणास श्री  मंदिरात येऊन दर्शन घ्यावयाचे असल्यास आपण श्री मंदिर च्या वेब साईट ला भेट देऊन नाव नोंदणी करावी व मिळालेल्या वेळेतच आपल्याला दर्शन घेता येईल.  मंदिर रोज सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उघडे आहे.  मंदिरात प्रवेश करताना मास्क वापरणे  आवश्यक आहे.
आपणास काही शंका किंवा प्रश्न असल्यास आपण श्री भुषण करंदीकर किंवा श्री दिलीप कानिटकर यांना संपर्क साधावा.
पुढीलवर्षी आपण सर्व जण हा गणेश उत्सव अधिक जोमाने साजरा करूया.
आपण सर्व जण कोविड पासून सुरक्षित व सुखरूप राहण्यासाठी श्री गणेशा कडे प्रार्थना करू या.
आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

Upcoming Events