Kalidas Jayanti – 2021

कालिदास जयंती २०२१

तप्त माती वरील पहिल्या पावसाचा शिडकावा हा मन सुखावणारा मृदगंध देतो तसाच आषाढाचा प्रथम दिवस हा कालिदास जयंती घेऊन येतो. 

सध्याच्या कठीण कालखंडात बर्‍याच कालावधीनंतर आपल्या भरगच्च कार्यक्रमांसोबतच  हा कार्यक्रम आपण करीत आहोत. 

मागील अनेक वर्षांपासून ह्या सुंदर कार्यक्रमाची गुंफण आपण करीत आलो आहोतच परंतू या वर्षी यांस एक वेगळे महत्व आहे. करोनामुळे मेटाकुटीला आलेल्या  जीवांस पुन्हा एकदा आपल्या सिडनी मधील साहित्यिक एक नव भरारी देतील यात तिळमात्र शंका नाही. 

ह्या कार्यक्रमाचे आयोजन अदमासे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात करण्याचे योजिले आहे. परिस्थितीवर नजर ठेवून गरज पडल्यास या वेळापत्रकात  कमी जास्त करावे लागल्यास मात्र क्षमा असावी. 

चला तर मग या साठी सर्व इच्छुकांनी आपली नावे सौ योगिनी लेले किंवा श्री आशीर्वाद आठवले यांकडे आगाऊ नोंदवावी ही विनंती. तसेच आपल्या स्वरचित कथा, कविता, स्फुट लेखन वा चारोळ्या कालिदास कमिटी ला kalidascommittee2021@gmail.com या ईमेल वर पाठविण्याचे योजावे  म्हणजे आम्हाला सुद्धा याचे नियोजन करणे सोपे जाईल. 

सर्व साहित्य 20 जून पर्यंत आमचे पर्यंत पोहोचवावे ही सर्व जनांस सादर विनंती. 

जाता जाता सर्वांच्या कष्टप्रद प्रवासाचा शेवट हा सकारात्मक वळणावर या प्रसिद्ध काव्याने करूया. 

भले बुरे ते घडून गेले

विसरून जाऊ सारे क्षणभर

जरा विसावू या वळणावर या वळणावर.

Upcoming Events