ग्रंथ तुमच्या दारी – ऑस्ट्रेलिया

‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’, नाशिक यांच्याद्वारे सुरु केलेली वाचकप्रिय योजना ‘संकल्प- एक निश्चय, मेलबर्न ‘ मागील ५ वर्षांपासून मेलबर्नमध्ये यशस्वीपणे राबवत असून आजमितीला ७०० पेक्षा जास्त दर्जेदार मराठी साहित्याची पुस्तके मेलबर्नच्या विविध भागात फिरत्या ग्रंथ पेट्यांच्या स्वरूपात वाचनासाठी उपलब्ध केलेली आहेत आणि वाचक त्याचा लाभ घेत आहेत.

”मराठी वाचक जेथे , ग्रंथ तुमच्या दारी तेथे!’ … ह्या संकल्पनेवर ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ काम करते. सदर कार्याच्या ऑस्ट्रेलियातील प्रचार, प्रसारासाठी ‘ संकल्प- एक निश्चय’ ऑक्टोबर २०१६ पासून कार्यरत आहे.
मागील वर्षांपासून ही योजना ऑस्ट्रेलियातील इतर राज्यातही वाढ घेऊ लागली आहे. सिडनी मध्ये ‘ग्रंथ तुमच्या दारी’ चे समन्वयक म्हणून सौ. संध्या पाटील आणि श्री. सर्जेराव पाटील कार्यरत आहेत.
या  व्यतिरिक्त ऍडलेड, पर्थ आणि ब्रिस्बेन या शहरातदेखील ग्रंथपेट्या दाखल झाल्या आहेत.

‘ग्रंथ तुमच्या दारी’ संकल्पनेचे ऑस्ट्रेलियातील स्वरूप थोडक्यात असे आहे  …
दर्जेदार विविध विषयांची , लेखकांची २५ पुस्तकांची एक पेटी ज्यामध्ये उत्तमोत्तम ,निवडक मराठी अथवा इतर भाषांतील साहित्याचा मराठीत अनुवाद असलेली पुस्तके असतात.  साहित्याचे ,लेखनशैलीचे जास्तीत जास्त नमुने जसे कथा , कादंबरी , विनोदी , रहस्य , चरित्र , प्रवासवर्णन. . .थोडक्यात सर्व समावेशक ग्रंथ संपदा देण्याचा प्रयत्न असतो आणि हे साहित्य वाचनासाठी विनामुल्य असते.एका वाचक कुटुंबाकडे/परिसरात सदर ग्रंथ पेटी ३ महिन्यांच्या कालावधी साठी असते आणि प्रत्येक पेटीतील पुस्तके वेगवेगळी असतील.  प्रत्येक पेटीत वैविध्यपूर्ण तसेच कोणतेही पुस्तक दुसऱ्या पेटीत सारखे होणार नाही याची दक्षता घेतली जाईल .दर ३ महिन्यांनी ग्रंथ पेटी अदलाबदल केली जाते. मेलबर्नमध्ये २५ ग्रंथपेट्या विविध भागांमध्ये फिरत असून संपूर्ण ऑस्ट्रेलियात सदर ग्रंथ पेट्या पोहोचवण्याचा सर्व समन्वयकांचा चा प्रयत्न आहे. दरवर्षी नाताळ सुट्टी दरम्यान ह्या पेट्यांची आंतर-राज्य देवाण घेवाण करण्यात येईल. जसे मेलबर्नमधील पेट्या ऍडलेड मध्ये, ऍडलेड मधील पेट्या सिडनी मध्ये, सिडनी तील पेट्या ब्रिस्बेन मध्ये आणि …..असेच ऑस्ट्रेलियात इतरत्र.

वाचन संस्कृतीचे पुनरुज्जीवन, वाचन संस्कृतीचे संवर्धन करणे आणि मोबाईल, कॉम्प्युटर मध्ये अडकत चाललेल्या नव्या पिढीला वाचनाने दिशा देणे या उद्देशाने ही चळवळ चालू केली आहे. आणि त्या चळवळीची ऑस्ट्रेलियात यशस्वी घोडदौड यशस्वीपणे सुरु आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.

सद्यस्थितीत सिडनी मध्ये कमी ग्रंथ पेट्या असल्याने वाचकांना पूर्ण पेटी ऐवजी सुटी पुस्तके दिली जातात. आणि पुस्तके वाचून झाल्यावर ती  पुस्तके बदली करून किंवा पुढील वाचकाकडे देऊन नवीन पुस्तके घेतली जातात. आपल्या मालकीची काही पुस्तके असतील , ती  वाचून झाली असतील आणि आपण ती इतर वाचकांना देऊ इच्छित असाल तर श्री. सर्जेराव पाटील यांच्याकडे संपर्क करावा.

आपणासही ही या अभिनव उपक्रमात भाग घ्यायचा असेल किंवा आपल्या शहरात/भागात ही योजना पोहोचवायची असेल तर ‘ग्रंथ तुमच्या दारी’ च्या  समन्वयकांशी संपर्क साधावा.

शहरनिहाय ‘ग्रंथ तुमच्या दारी’ समन्वयक पुढीलप्रमाणे;

सिडनी –  सौ. संध्या पाटील आणि श्री. सर्जेराव पाटील
सर्जेराव : 0430 583 588

ऍडलेड  – सौ. अमिता कुलकर्णी आणि श्री. दिलीप कुलकर्णी

पर्थ – श्री. सतीश डोंगरे

ब्रिस्बेन – श्री. संकेत पारनेरकर

मेलबर्न – श्री. गणेश किरवे आणि श्री.  प्रसाद पाटील

ग्रंथ तुमच्या दारी – सिडनी ऑस्ट्रेलिया
फेसबुक page : https://www.facebook.com/marathilibrarysydney/


धन्यवाद

Upcoming Events