सध्या भारतात कोविड महामारी संसर्गाचा प्रसार झपाट्याने होत आहे. कोविडच्या ह्या दुसऱ्या लाटेने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी आपण सर्वांनी सढळ हस्ते केलेली आर्थिक मदत आपल्याच भगिनी आणि बांधवांना ह्या संकटाशी दोन हात करण्यास पूरक ठरेल. सर्वांना नम्र आवाहन आहे की खालील पैकी कुठच्याही संस्थेला आपण आर्थिक मदत करू शकता.
१. ऑस्ट्रेलिया तील सेवा इंटरनॅशनल संस्था. ह्या संस्थेला दिलेली देणगी टॅक्स दीडक्टशन साठी आपण आपल्या टॅक्स रिटर्न मध्ये क्लेम करू शकता.
२. भारतीय पंतप्रधान निधी. देणगीसाठी भेट द्या www.pmcares.gov.in
३. मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड १९). देणगीसाठी भेट द्या www.cmrf.maharashtra.gov.in