पिंक सारी प्रोजेक्ट हा community driven उपक्रम आहे. भारतीय व श्रीलंकन लोकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर awareness व मॅमोग्राम करून घेण्याचे महत्व ह्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम ही सामाजिक संस्था करते. आपल्यामद्धे एकंदरच ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग करण्याचे प्रमाण फार कमी आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होऊन पुन्हा सामान्य आयुष्य जगण्यासाठी, सर्व ५० वर्षांवरील महिलांनी माओग्रॅम करावा अशी आग्रहाची विनंती आहे.
पिंक सारी – strathfield मध्ये आयोजित करण्यात होणाऱ्या ‘बियॉन्ड पिंक’ ह्या उपक्रमाचा भाग म्हणून आपल्याला मोफत कार्यशाळांसाठी आमंत्रित करत आहे.
‘बियॉन्ड पिंक’चा मुख्य फोकस म्हणजे दक्षिण आशियाई समुदायातील व्यक्तींशी, पुरुष आणि स्त्रिया, संपर्क साधणे हा आहे.
कर्करोगाचे निदान झालेले, remission मद्धे असलेले, आणि बरे झालेले लोक, तसेच त्यांची काळजी घेणारे लोक, primary carers, कुटुंबातील सदस्य/ मित्र यांना माहिती, ज्ञान आणि skills देऊन ते ज्या लोकांची काळजी घेत आहेत त्यांच्यासाठी व त्याबरोबरच त्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी यासाठी, Pink Saree कार्यशाळा आयोजित करत आहे.
उपलब्ध सेवा, creative writing, नृत्य आणि कला थेरपी या विषयांवर तीन कार्यशाळा आयोजित करत आहेत. आपणा सर्वांना त्यासाठी आग्रहाचे निमंत्रण आहे.
ह्या कार्यशाळांची तारीख व स्थळ खालील प्रमाणे
पहिले वर्कशॉप: शुक्रवार, 25 मार्च.
Onco-Psychology and Dance Therapy
वेळ: सकाळी १० ते दुपारी १
स्ट्रॅथफील्ड कम्युनिटी सेंटर, 64 हाय स्ट्रीट, स्ट्रॅथफील्ड 2135
नंतर दुपारचे जेवण.
दुसरे वर्कशॉप ऑनलाइन zoom
शुक्रवार, 1 एप्रिल
सकाळी 10 ते दुपारी 12
Creative writing and Support Services information.
तिसरे वर्कशॉप: शनिवार, 9 एप्रिल
सकाळी १० ते दुपारी १
Art Therapy
स्ट्रॅथफील्ड टाउन हॉल, 65 होमबुश रोड, स्ट्रॅथफील्ड 2135
नंतर दुपारचे जेवण.
ही सर्व वर्कशॉप मोफत आहेत. मात्र नोंदणी करणे आवश्यक.
अधिक माहितीसाठी सुनीला कोतवाल यांच्याशी संपर्क साधा. email: sunilakotwal@gmail.com