सप्रेम नमस्कार,
गत वर्षाप्रमाणेच २०२१ हे वर्षही सरकारी आणि आरोग्य प्रतिबंधात गेल, तरीही, मासीने सरकारी आणि आरोग्य विषयक आदेशानुरुप काही मोजकेच पण उत्तम उपक्रम राबवले. काही उल्लेखनीय उपक्रम पुढील प्रमाणे:
- फक्त महिलांसाठी असलेला सखी ग सखी हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रत्यक्ष सहभाग घेऊन सर्व सख्यांनी कार्यक्रमाचा पुरेपूर आस्वाद घेतला.
- मासीच्या इतिहासात पहिल्यांदाच कालिदास जयंती आभासी पद्धतीने साजरी करण्यात आली व सिडनी मधील स्थानिक मराठी साहित्यिक कलाविष्कार जभरातील मराठी भाषाप्रेमिकां पर्यंत दृक्श्राव्य पद्धतीने या कार्यक्रमा मार्फत पोचू शकला.
- डॉ. इला देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एका आभासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
- त्याच प्रमाणे संप्रेषण माध्यमांचे नूतनीकरण करून whatsApp, Facebook, मासी App, website, नियमित परिपत्रके इत्यादी द्वारे मसीचे कार्यक्रम व अद्ययावत माहिती तसेच आरोग्य, कला, साहित्य इत्यादी अनेकविध विषयासंबंधी माहिती आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
अर्थात हे सर्व उपक्रम अनेक स्वयंसेवकांचा हातभार, आपण सर्वांनी दिलेले प्रोत्साहान, तसेच वेळोवेळी अनेक प्रयोजकांनी दिलेल्या आर्थिक सहाय्या मुळे शक्य झाले. मासी तर्फे आपणा सर्वांचे मनापासून आभार.
हरिओम फूड्स तर्फे यंदाच्या वर्षी (२०२१) वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यास $10 आणि आजीवन सभासदत्व घेणाऱ्यास $20 चे जिन्नस मोफत जाहीर केले होते. मासी कार्यकारी समितीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार.
२०२२ हे वर्ष याहून अधिक कार्यक्रमांची पर्वणी घेऊन येईल यात शंका नाही. त्या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी आपण सभासदत्व घ्याल अथवा नूतनीकरण कराल अशी अशा आहे. कृपया, २०२२ वर्षाचे सभासदत्व शुल्क ऑनलाईन पुढील लिंक वर क्लिक करून Pay Online अथवा खालील बँक खात्यावर जमा करण्याची आपल्याला नम्र विनंती.
खात्याचे नाव : Marathi Association Sydney Inc
खाते क्रमांक: BSB 112 879 478425331
२०२१ या वर्षात मासी कार्यकारी समितीला अनेक प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जावे लागले परंतु या अडचणीच्या प्रसंगी आपल्या सामंजस्याबद्दल, सहकार्याबद्दल आणि प्रोत्साहानबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि येणाऱ्या नवीन वर्षात पण आपली साथ अशीच राहील अशी अशा करत २०२२ वर्षाचे स्वागत करूया!
२०२२ हे नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! नववर्षाभिनंदन ! नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
कळावे लोभ असावा ही विनंती!
मासी कार्यकारी समिती २०२१ |