स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विश्व संमेलन
रसिकहो, मराठी असोसिएशन सिडनी (MASI) यांच्या सहाय्याने शनिवार दिनांक २७ मे २०१७ रोजी चवथे सावरकर विश्व संमेलन सिडनीत साजरे होत आहे. या संमेलनात भाग घेण्यासाठी भारतातून आपले आवडते नट आणि वक्ते श्री शरद पोंक्षे, विख्यात लेखक डॉ सच्चीदानंद शेवडे, महाराष्ट्र राज्य माहिती विभाग प्रमुख श्री देवेंद्र भुजबळ, पत्रकार श्री शरद पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री दीपक दळवी, प्रसिद्ध गायक आशीर्वाद दांडे, नृत्य कलाकार ज्योती सावंत, आणि कवयित्री स्वाती सुरंगळीकर येणार आहेत. हे कलाकार “सावरकर- एक झंझावात”, सावरकरांची पत्रकारिता, सावरकरांच्या कवितांचं अभिवाचन या सारखे अनेक कार्यक्रम सादर करणार आहेत. श्री शरद पोंक्षे “ज्ञात अज्ञात सावरकर” आणि “राष्ट्र जागर” या विषयांवर बोलणार आहेत. विशेष म्हणजे, या चौथ्या सावरकर संमेलनात “छत्रपती आणि शिवनीती” व “प्रभो शिवाजी राजा” असे दोन कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत. आपले काही स्थानिक कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमात दुपार व रात्रीचे जेवण आणि चहा पाण्याची सोय केलेली आहे.
दिवस: : शनिवार, दिनांक २७ मे २०१७
स्थळ: लवकरच जाहीर करण्यात येईल
तिकीट दर:लवकरच जाहीर करण्यात येईल
मराठी असोसिएशन सिडनी तर्फे आपल्या सर्वाना या कार्यक्रमाचे अगत्यपूर्वक आमंत्रण.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा;
नितीन चौधरी (0433444822)
साईप्रसाद कुलकर्णी (0424253287)
भूषण महाजन (0450085860)
सुनील रणदिवे (0411384342)
श्रीकांत मोने (0430916639)
|