1st June 2024
नमस्कार,
कार्यक्रम संपल्यानंतर खरं तर श्रमपरिहाराची व विश्रांतीची गरज असते पण त्रिवेणी एकांकीकेच्या कार्यक्रमाअंतर्गत समितीतील सभासद असोत वा कुणी स्वयंसेवक असोत ते कार्यक्रम संपल्यावरही रविवारपर्यंत काम करत होते.
ही पोस्ट खरं तर त्या सगळ्यांसाठी.
प्रथम तीन एकांकिकेतल्या सगळ्या सहभागी कलाकार, स्वयंसेवक, back stage स्वयंसेवक, प्रकाशयोजना संयोजक, छायाचित्रकार, चलचित्रकार, सूत्रसंचालन करणारी आमची तरुण आघाडीतील जोडी आणि बाहेर संततधार पाऊस व वातावरण थंड असताना प्रत्येक मध्यांतरात चहा कॉफी कमी पडू दिला नाही ती आमची हक्काची काही माणसं ह्या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानत आहोत.
तुम्ही सगळे प्रेक्षक म्हणून जी दाद दिलीत त्याला आमचा नमस्कार. दोन एकांकीकेच्या दरम्यान सेट बदलताना लागणारा विलंबही हसतखेळत स्वीकारलात आणि उशीर होत असतानाही तिसऱ्या एकांकिकेला थांबून न्याय दिलात त्यासाठी सलाम.
खरं तर इतकी लोकं ह्या कार्यक्रमात सहभागी होती आणि इतके हाथ लागले आहेत की इथे नावं घेणं अवघड आहे त्यामुळे अनवधानाने कुणाचा उल्लेख राहिला असेल तर माफ करा.
असेच कार्यक्रमाला येत रहा आणि उस्फूर्त प्रतिसाद देत रहा त्याने आम्हा समितीतील सगळ्यांना काम करण्याचा हुरूप वृद्धिंगत होतो.
आता काही फोटो आले आहेत आणि ते तुमच्या सगळ्यांसाठी खाली पाठवत आहे.
आपली,
मासी समिती 2024.