कालिदास जयंती

20th July 2024

मंडळी,

शनिवारी कालिदास जयंती सोहळा सिडनीत मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉपोरटेड (MASI) तर्फे पार पडला. ह्या सोहळ्याचे/कार्यक्रमाचे महत्वाचे व काही ठळक पैलू बघितले तर ते खालीलप्रमाणे:

१. पुढे येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करून पद्मजा, मानसी आणि नरेंद्र ह्यांना समितीत कमी लोकं आणि कमी वेळ ह्या न दिसणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागले. तर त्याबरोबरीने मासीची बाजू उत्तमरित्या सांभाळत मासी कार्यकारिणी समितीने कालिदास जयंती समितीच्या पाठीमागे राहून कार्यक्रम गुणवत्तेच्या कक्षा रुंदावत नक्कीच यशस्वीपणे राबविता येतो हे सिद्ध केलं.

२. तरुण आणि लहान मुलांच्या सहभागाने कार्यक्रमाला नवीन सहभागी कलाकार मिळाले. लहान मुलांच्या दिंडीने कार्यक्रमाची सुरवात होऊन मंगलमय वातावरणाची निर्मिती झाली व मुलांनाही त्याचे महत्वही वाटले.

३. आमच्या सगळ्या स्वयंसेवकांनी घेतलेली मेहनत ही स्टेज सजवण्यापासून, स्वागत कक्षात तिकिटं तपासणे, कालच्या थंड वातावरणात कायम चहा कॉफी उपलब्ध करणे, मध्यंतरात दहा ते पंधरा मिनिटात उपहाराची व्यवस्था होणे आणि शेवटी हॉल आवरून वेळेत हॉल बंद करून बाहेर पडणे हे स्वयंसेवकांशिवाय नक्कीच शक्य नव्हते.

४. आता महत्वाचे म्हणजे प्रेक्षक, जे वर्षानुवर्षे ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने येतात आणि सहभागी कलाकारांच्या लिखाणाचे कौतुक करण्यासाठी उपस्थिती लावतात.

५. कुठलाही कार्यक्रम म्हंटला की त्याला पैशाची जोड ही लागतेच आणि कार्यक्रमाला व्यावसायिकरित्या यशस्वी (commercially viable) कसे करता येईल ह्याची हमी कार्यक्रमाची प्राथमिक बाजू सांभाळतानाच करावी लागते. त्यामुळे सभासदांसाठी कार्यक्रमाचे कमीत कमी तिकीट ठेऊन आमच्या sponsors ने ती साथ आम्हाला दिली.

६. कार्यक्रमाची सांगता सुरेल आवाजात पद्मजाने म्हटलेल्या पसायदानानी आणि त्याला दिलेल्या प्रेक्षकांच्या साथीने होऊन कर्यक्रम यथासांग संपन्न झाला.

हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडण्यात असलेल्या आपल्या प्रत्येकाच्या सहकार्याबद्दल आम्ही मासी समिती तुमच्या सगळ्यांचे आभारी आहोत🙏

आता शनिवारच्या कालिदास जयंतीच्या कार्यक्रमाचे काही फोटो व क्षण तुमच्या सगळ्यांसाठी खाली जोडत आहोत.

Upcoming Events