Loading Events

« All Events

  • This event has passed.

Global Online Marathi Sammelan

विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २०२१.

निःशुल्क प्रवेश… नोंदणी आवश्यक.. प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र मिळणार.

बृहन् महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २७ देशातील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने
 
२८, २९, ३० आणि ३१ जानेवारी, २०२१ रोजी होणार
 
यामध्ये एक दिवस स्वतंत्र *विश्व मराठी युवा संमेलन* होणार आहे.
 
  • अनिल काकोडकर महासंमेलनाध्यक्ष
  • ९ अध्यक्षांचे अध्यक्ष मंडळ
  • सुमित्रा महाजन महास्वागताध्यक्ष*
  • २५ देशातून २५ स्वागताध्यक्ष
  • अमेरिकेतील बीएमएमच्या अध्यक्ष – विद्या जोशी महासंरक्षक
  • जगभरातील ३२ देशातून, अमेरिकेतून ५० राज्यातील, भारतातील १२ राज्यातील आणि १५० हून अधिक संस्था,  ५०० हून अधिक वाचनालये आणि १००० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग
साहित्य, संस्कृती, उद्योजकता, लोककला यासह बहुविध उपक्रमांची रेलचेल.
 
संमेलनासाठी निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करा – 

१२ कोटी मराठी भाषिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि *सक्षम, समर्थ आणि समृद्ध अशा वैश्विक मराठी भाषिक समाजाचे स्वप्न बघणाऱ्या विश्व मराठी परिषदेने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२१* असे  ४ दिवसांचे एक ऑनलाईन विश्व मराठी संमेलन आयोजित केले आहे. यात एक दिवसाच्या *स्वतंत्र विश्व मराठी युवक संमेलनाचाही* समावेश आहे. संमेलन सर्वांसाठी *पूर्णतः निःशुल्क* असून १२ कोटी मराठी भाषिकांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वैश्विक स्तरावर होणारे हे असे पहिलेच संमेलन ठरेल.
 
*सुमित्राताई महाजन* या संमेलनाच्या महास्वागताध्यक्ष असून उत्तर अमेरिकेतील सर्व  महाराष्ट्र मंडळांची प्रातिनिधिक संस्था असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकाच्या अध्यक्ष *विद्या जोशी* संमेलनाच्या महासंरक्षक असतील. 
 
*संमेलनामध्ये प्रथमच ९ जणांचे अध्यक्षीय मंडळ असेल.*
 
*डॉ. अनिल काकोडकर* हे महासंमेलनाध्यक्ष असून –  साहित्य विभाग – *भारत सासणे,* पुणे आणि *डॉ. विनता कुलकर्णी*, शिकागो, – संस्कृती विभाग – *सयाजी शिंदे* आणि *रश्मी गावंडे*, फ्रॅंकफर्ट,   उद्योजक विभाग – *डॉ. प्रमोद चौधरी* आणि *मृणाल पंडित-कुलकर्णी*, लंडन, युवा विभाग – *उमेश झिरपे* आणि *अजित रानडे* जर्मनी हे संमेलनाध्यक्ष असतील.
 
२५ देशांमधून २५  स्वागताध्यक्ष असून  *लीना सोहनी* या भारतातील स्वागताध्यक्ष आहेत.
 
संमेलन आयोजक कार्यकारिणी ही  ५१ जणांची असून त्यात भारताबाहेरील विविध देशातील २५  महाराष्ट्रातील १५ आणि भारतातील इतर राज्यातील ११ व्यक्तींचा समावेश आहे.
 
महाराष्ट्रातील  विविध जिल्हे आणि शहरे यातून २०१ प्रतिनिधी असून महाविद्यालये समन्वयक समिती – ११ जण, संस्था समन्वयक समिती – ११ जण, वाचनालये समन्वयक समिती – ११ जण आणि विविध उपक्रम समन्वयक समिती – ११ जण अशा एकूण – २४५ व्यक्ती काम पाहणार आहेत.
 
संमेलनामध्ये सुमारे ३२ देशातील, अमेरिकेतून ४० राज्यातील, भारतातील १२ राज्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी भाषिक बांधव तसेच १५० हून अधिक संस्था,  ५०० हून अधिक वाचनालये आणि १००० हून अधिक महविद्यालये सहभागी होत आहेत.
 
संमेलनामध्ये चर्चा, परिसंवाद, कविकट्टा, कथा कट्टा, संस्कृती कट्टा, आयडिया कट्टा – कल्पनांचे सादरीकरण, वडिलधाऱ्यांसाठी मनोगत कट्टा – सांगेन गोष्टी युक्तिच्या चार, वैश्विक प्रतिभा संगम, उपयुक्त माहितीची देवाणघेवाण, इ. बहुविध उपक्रम सादर करणार आहेत.
 
*कवीकट्टा* – मराठी बांधवांच्या सृजनात्मक निर्मितीला जागतिक व्यासपीठ मिळावे, वैश्विक संधी उपलब्ध व्हाव्यात हा “कवीकट्टा” या उपक्रमाचा उद्देश आहे.
 
*कथाकट्टा* – मराठी बांधवांच्या सृजनात्मक निर्मितीला जागतिक व्यासपीठ मिळावे, वैश्विक संधी उपलब्ध व्हाव्यात हा “कथाकट्टा” या उपक्रमाचा उद्देश आहे.
 
*आयडिया कट्टा* – विविध प्रकारच्या क्रांतिकारी, उद्योजकीय, आसपासची परिस्थिती बदलू शकणाऱ्या कल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने विश्व मराठी परिषदेने “आयडिया कट्टा” हा अभिनव उपक्रम आयोजित केला आहे. त्याचबरोबर मागील काही वर्षांमध्ये ज्यांनी स्टार्टअप सुरु केले आहे त्याविषयीची माहिती या उपक्रमाद्वारे शेअर केली जाणार आहे.
 
*संस्कृती कट्टा* – संस्कृतीची पाळेमुळे खेडोपाड्यांमध्ये वसलेली आहेत. केवळ शहरी भागांमध्ये सादर होणारे तथाकथित सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे संस्कृती नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यातसुद्धा आपले अस्तित्व राखून असलेल्या ग्रामीण संस्कृती आणि तिच्या विविध आयामांना जगासमोर आणणे असा या उपक्रमाचा उद्देश आहे.
 
*सांगेन गोष्टी युक्तीच्या चार ( मनोगत कट्टा )* – वडीलधाऱ्यांचे अनुभव, मनोगत, उपदेश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहचावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
 
*वैश्विक प्रतिभा संगम* – माहितीचे आदान प्रदान, वैश्विक ओळख आणि निर्मितीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमामध्ये साहित्यिक – लेखक, कवी, अनुवादक, बालसाहित्यिक, प्रकाशक, कलाकार – गायक, संगीतकार, कीर्तनकार, प्रवचनकार, पोवाडा, लावणी, वासुदेव, कडकलक्ष्मी, मर्दानी खेळ, एकपात्री कलाकार, सूत्रसंचालक, निवेदक, पोतराज, एकांकिका सादर करणारे, चित्रकार, भटजी (पौरोहित्य करणारे), दशावतार, खेळाडू, गोंधळी, मंगळागौर, नृत्यांगना, धनगरी नृत्य, दंडार, खाडी गम्मत, तुंबडी वादक, पालखी, जाखडी, नकटा, लेझिम पथक, ढोल पथक, संबळ पथक, वनवासी कला आणि नृत्ये, कोळी नृत्ये, इ. तसेच संस्था – सांस्कृतिक उपक्रम संस्था, एनजीओ, समाजपयोगी संस्था , देवस्थान, बचतगट, उत्पादक, स्टार्टअप यांची माहिती संमेलनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे. या उपक्रमातून जगभरातील मराठी भाषिक त्यांच्याशी थेट जोडले जातील. 
 
आत्तापर्यंत २५ देशातील ( अमेरिका, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, युगांडा, झांबिया, नायजेरिया इ. ) महाराष्ट्र मंडळांनी संमेलनासाठी आपला सहयोग दर्शविण्यासंबंधी लेखी पत्रे दिली आहेत. *”बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका” ही अमेरिकेतील ६० राज्यांमधील बृहन महाराष्ट्र मंडळाची शिखर संस्था, भारताबाहेरील सर्वात मोठी मराठी भाषिकांची संस्था “मराठी विश्व, न्यूजर्सी, अमेरिका”, छत्रपती शिवाजी महाराज अमेरिका परिवार, बृहन् महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली* इ. देश, विदेशातील अनेक संस्था  संमेलनासाठी सक्रिय सहयोग करीत आहेत.
 
संमेलनासाठी विशेष संकेतस्थळ तयार करण्यात येत असून त्यावर संमेलनाची विस्तृत माहिती उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.  देश,विदेशातील मराठी बांधवांनी  *संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून नि:शुल्क नोंदणी* करण्यासाठी 
या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन विश्व मराठी परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.
देश विदेशातील मराठी भाषिकांनी या संमेलनामध्ये  सहभागी व्हावे असे आवाहन *विश्व मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले आणि संस्थापक संचालक अनिल कुलकर्णी* यांनी केले आहे. 
 
*संवाद साधा… संधी मिळवा… प्रगती करा… समृद्ध बना… संपन्न बना…* चला… आपण सारे मिळून *सक्षम, संपन्न आणि समृद्ध वैश्विक मराठी भाषिक* समाज घडवू या…
 
*विश्व मराठी परिषदेचे प्रतिष्ठित आजीव सभासद व्हा…* 
 
अधिक माहिती साठी संपर्क 
विश्व मराठी परिषद,
द्वारा विश्व मराठी फाउंडेशन, ६२२, जानकी रघुनाथ, पुलाचीवाडी, डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४ भारत
 
मोबाईल – 7030411506 आणि 7843083706
 
व्हॉटसअप – 7066251262
 
वि. म. प. अमेरिका – वैष्णवी आपटे – +1 (248) 293-0166
 
वि. म. प. लंडन – नितीन कुलकर्णी – 
+44 7459 244 364
 
वि. म. प. मेलबर्न – रश्मी गोरे
+61 469 882 251
 
वि. म. प. स्वित्झर्लंड – प्रिया आपटे 
+41 76 519 74 44